घरताज्या घडामोडीदशावतार दुर्दैवाचा! दशावतार कलावंतांची परिस्थिती अतिशय बिकट

दशावतार दुर्दैवाचा! दशावतार कलावंतांची परिस्थिती अतिशय बिकट

Subscribe

आपला इतिहास ,आपली संस्कृती ,आपली लोककला खड़तर परिस्थितीत जोपसणाऱ्यां या दशावतार कलाकार व नाट्य मंडळ याना मदतीचा हात देण्याची गरज

मागील वर्षी २०२० मध्ये अचानक आलेल्या कोरोना महामारीच्या संकटाने आधीच कोलमडून गेलेल्यां सर्वसामान्य माणसाला कोरोनाची दूसरी लाट नेस्तनाबूत करते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. यात हजारो वर्षाचा इतिहास असलेली लोककला “दशावतार” जपणाऱ्या कलाकारांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. आधीच “रात्री चो राजा, सकाळी घेता कपाळार बोजा” अशी स्थिती कोकणातील दशावतार कलाकाराची असते. दशावतार कलेतून मिळणाऱ्या मोबदल्यातून फक्त रोजीरोटी भागत असते. तीही सध्या बंद असल्याने या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तळ कोकणात ग्रामदेवतांच्या जत्रोत्सवात दशावतार सादर करण्याची परंपरा आहे. रात्रभर चालणाऱ्या या नाटकातून पौराणिक कथा सादर केली जाते. विशेष म्हणजे या नाटकातून स्त्री पात्र ही पुरुष कलाकारच साकारतात. रंगभूषा, वेशभूषा कलाकार स्वतःच करतात, तर कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला हा कलाकार नो स्क्रिप्ट नो रीटेक घेता उत्कृष्ट अभिनय करत असतो. खरतर ही लोककला या हरहुन्नरी व हौशी कलाकारां मुळे च जीवंत आहे मात्र या कलाकाराना ही पोट असत ,कुटुंब असत. आज कोरोना महामारी व पर्यायाने आलेले लॉकडाउन मुळे या कलाकारांची परवड झाली आहे.

- Advertisement -

पालकत्व स्विकारलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांचे याकडे लक्ष वेधले असता त्यानी ६० वर्षावरील नोंदणी असलेल्या वृद्ध कलाकारांना मिळणारे मानधन लवकरात लवकर मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. मात्र तरुण कलाकाराना सध्या तरी कुणी वाली उरला नाहीय हेच खरे! लोककलेला राजाश्रय मिळायला हवा वैगरे वैगरे वल्गना आपण नेहमी च ऐकतो पण वेळ आली की सर्व हवेत विरत, आपला इतिहास ,आपली संस्कृती ,आपली लोककला खड़तर परिस्थितीत जोपसणाऱ्यां या दशावतार कलाकार व नाट्य मंडळ याना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वपक्षीय राजकारण्यांनी मतभेद बाजूला ठेवून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करायला हवा, असे कलाकारांचे म्हणणे आहे.

दशावतार दुर्दैवाचा! दशावतार कलावंतांची परिस्थिती अतिशय बिकट
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -