मुंबई महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचाराची दुर्गंधी : नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी दुर्गंधी आहे. मुंबई बकाल केली असल्याचं म्हटलं.

Narayan rane warn shivsena over ed notice and sushant singh rajput death mystery

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 14 मे रोजी बीकेसी येथे मास्टर सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष भारतीय जनता पार्टी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हल्लाबोल केला. त्यांच्या या सभेनंतर भाजपाच्या नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. तसंच, आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी दुर्गंधी आहे. मुंबई बकाल केली असल्याचं म्हटलं.

“राज्याचे मुख्यमंत्री कुठल्या भाषेत बोलू शकतात त्याचा अंदाज राज्यातील जनतेला आहे. आमचं हिंदूत्व चूल पेटवणारं घर पेटवणारं नाही. हे शेवटचं वाक्य बोलणं गरजेचं नव्हतं.” यावेळी त्यांनी कोण चुल पेटवतं? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसंच, त्यांना तुम्ही चुल पेटवणारे आहात तर गेल्या अडीच वर्षात किती चुल पेटवल्या? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. किती लोकांना रोजगार नोकऱ्या दिल्या? उद्योग किती आणले? यांसह अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले. तुम्ही किती रोजगार दिले यासाठी पेपरला का नाही दिलं? सभा कशाला घेतली? असा सवाल विचारत त्यांनी टोला हाणला.

मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी दुर्गंधी

“मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी दुर्गंधी आहे. मुंबई बकाल केली असल्याचं राणे यांनी म्हटलं. तसंच, मुंबई महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचाराची दुर्गंधी असल्याचे राणे यांनी सांगत शिवसेनेवर हल्लाबोल केला. तसंच, महापालिकेतील भ्रष्टाचार भारतात सोडा जगाच्या पाठीवर नसेल. एका बाजूसा भ्रष्टाचार करायचा दुसऱ्याबाजूला कौतुकाची पुस्तकं छापायची, अशी टीका नारायण राणे यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर केला. कोरोनाकाळात १ लाख ६० हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमवला तरी आपली पाठ थोपटून घेत आहेत. कोरोनाच्या खरेदीमध्ये करोड रुपयांचे भ्रष्टाचार झाला, तरी पाठ थोपटून घेताहेत”, असं राणे यांनी म्हटलं.

दिशा सालीयान आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचे आयुष्य उद्वस्त

महापालिकेच्या नालेसफाईबाबत नारायण राणे यांनी भाष्य केलं. १५ मे पर्यंत ७५ टक्के नालेसफाई व्हायला पाहिजे होती. मात्र ३४ टक्केच झाली, तरिही पाठ थोपटून घेताहेत. आणि चूली पेटवायला निघालेत, उद्वस्त करत आहात. नारायण राणे यांनी पुन्हा एकदा दिशा सालीयान आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या मुद्द्यावर भाष्य केलं. दिशा सालीयान आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचे आयुष्य उद्वस्त केल्याचं त्यांनी म्हटलं.


हेही वाचा – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे प्रत्युत्तर