घरताज्या घडामोडीसफाई कामगाराची सुप्रिया सुळेंकडे विनंती; म्हणाला, 'पवार साहेबांना...'

सफाई कामगाराची सुप्रिया सुळेंकडे विनंती; म्हणाला, ‘पवार साहेबांना…’

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे काल (2 मे) प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात भाषण करताना शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. राजीनामा परत घ्या अशी मागणी कार्यकर्ते त्यावेळी करत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे काल (2 मे) प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात भाषण करताना शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. राजीनामा परत घ्या अशी मागणी कार्यकर्ते त्यावेळी करत होते. मात्र एकीकडे कार्यकर्ते शरद पवारांनी राजीनामा मागे घेणे सांगणे हे स्वाभाविकच आहे, परंतु, एका सफाई कामगारानेही शरद पवारांनी निर्णय बदलावा अशी विनंती केली आहे. त्यामुळे शरद पवारांचा हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांसाठीही महत्त्वाचा आहे. (The sweeper stopped Supriya Sule and said tell Sharad Pawar Saheb to take back resignation as party president vvp96)

नेमके काय घडलं?

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज (3 मे) मॉर्निंग वॉकसाठी मुंबईच्या रस्त्यावर फिरत होत्या. त्यावेळी रस्त्यावर साफसफाई करत असललेल्या एका सफाई कामगाराने त्यांचे शरद पवारांनी निर्णय बदलावा अशी विनंती केली. संदेश पवार असे या सफाई कामगाराचे नाव आहे. “ताई, साहेबांना निर्णय बदलायला सांगा, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच असायला हवेत. कारण, पवार साहेबांचे विचार हे शाहू-फुले-आंबेडकरांचेच विचार आहेत”, असे सफाई कामगार संदेश पवार यांनी सांगितले.

संदेश पवार हे मूळचे राजापूरचे असून सध्या मुंबईतील रेसकोर्स परिसरात बीएमसीचे सफाई कामगार म्हणून ते कार्यरत आहेत. या सर्व घटनेचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूकवर शेअर केला आहे.

- Advertisement -

राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते भावूक

दरम्यान, शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘साहेब तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घ्या’, अशी विनंती करत कार्यकर्ते घोषणा देत आहेत. अनेक कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते. शिवाय, राज्यभरात पवारांच्या या निर्णयाचे पडसाद पाहायला मिळाले.

शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अनेक ठिकाणी राजीनामा सत्रही सुरू झाले होते. धाराशिव आणि बुलडाणा जिल्ह्याच्या प्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. मात्र, अजित पवार यांनी तात्काळ मीडियाच्या माध्यमातून हे राजीनामे थांबवण्याचे आवाहन केले.

शरद पवार यांच्यासमेवत बैठक घेऊन वरिष्ठ नेते त्यांच्याच मार्गदर्शनात पुढील निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी भावनिक होऊ नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशीही कार्यकर्त्यांचा आक्रोश आणि भावनिकता कायम असल्याचे दिसून येते.


हेही वाचा – ‘निवृत्त पदाधिकारी होतात, जनतेच्या मनातील राजे…’, पुण्यात पवारसमर्थकांची बॅनरबाजी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -