घरमहाराष्ट्रतरुणांना आता जलववाहतूक क्षेत्रात रोजगाराची संधी

तरुणांना आता जलववाहतूक क्षेत्रात रोजगाराची संधी

Subscribe

देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी वाहतूक कंपनी असलेल्या ऑलकार्गो लॉजिस्टिक या कंपनीने जेएनपीटी आणि सिडकोशी सामंजस्य करार केला आहे.

देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी वाहतूक कंपनी असलेल्या ऑलकार्गो लॉजिस्टिक या कंपनीने जेएनपीटी आणि सिडकोशी सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत ऑलकार्गो जेएनपीटीजवळ बोकडवीरा उरण येथे कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करणार असून त्याचे व्यवस्थापन, प्रशासन आणि देखभाल दुरुस्ती करणार आहे. अंतर्गत बंदरे आणि जल वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळवण्याची समाजाच्या वंचित घटकातील तरुणांची क्षमता वाढीस लागावी यासाठी अशा तरुणांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रधान मंत्री कौशल्य केंद्र (पीएमकेके) म्हणून संकल्पित, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. कौशल्य विकास केंद्रांत गरजू तरुणांना वाहतूक क्षेत्रातील उद्योग केंद्रित आणि रोजगार पूरक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय सागरमाला अंतर्गत कौशल्य विकासाला राष्ट्रील कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी), सेक्टर स्किल कौन्सिल, आणि प्रधान मंत्री कौशल विकास योजना (पीएमकेव्हीवाय) आणि प्रधान मंत्री कौशल केंद्र (पीएमकेके) यांच्या माध्यमातून पाठबळ देत आहे. बोकडवीरा, उरण येथील कौशल्य विकास केंद्रात महत्वाच्या विभागासाठीचे प्रशिक्षण दिले जाणार असून, पिकर, पॅकर, गोदाम सुपरवाईजर, अवजड वाहन ऑपरेटर आदी नोकऱ्या मिळवण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. वंचित तरुणांना वाहतूक आणि बंदरे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यासाठी ऑलकार्गो कटिबद्ध आहे. भारतीय जलवाहतूक क्षेत्रात सक्षम आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षण उपक्रमात जेएनपीटी आणि सिडको अशा संस्थांशी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे, असे ऑलकार्गो लॉजिस्टिकचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांनी सांगितले.

- Advertisement -

सामाजिक विकास आणि सामाजिक सेवा यावर ऑलकार्गोचा दृढ विश्वास आहे. अवश्य फाउंडेशनच्या माध्यमातून कंपनी पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, क्रीडा आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आदी क्षेत्रात कार्यरत आहे. या माध्यमातून कंपनी आतापर्यंत लाखो लाभार्थींपर्यंत पोहोचली आहे. न्हावा शेवा सीएफएस येथे ऑलकार्गोचा निपुण हा समर्पित कौशल्य विकास कार्यक्रम सुरु असून, नजीकच्या परिसरातील बेरोजगार तरुणांना जलवाहतूक क्षेत्रातील आणि त्यासंबंधी क्षेत्रातील संधींसंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. ऑलकार्गोने “ऑलकार्गो ग्रीन” हे देशपातळीवरील अभियान सुरु केले असून हरित आणि स्वच्छ जीवनशैलीच्या प्रसाराचा या अभियानाचा उद्देश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -