Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Cyclone in Arabian sea 2021: यंदाच्या वर्षातील अरबी समुद्रातील हे पहिलंच चक्रीवादळ,...

Cyclone in Arabian sea 2021: यंदाच्या वर्षातील अरबी समुद्रातील हे पहिलंच चक्रीवादळ, सावधानतेचा इशारा

Subscribe

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर येत्या रविवारी यंदाच्या वर्षातील अरबी समुद्रातील पहिलं चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविली आहे. तर पूर्वेकडील अरबी समुद्रात मंगळवारी या संभाव्य चक्रीवादळाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला निसर्ग या चक्रीवादळाचा थेट तडाखा कोकण किनारपट्टीला बसला होता. परंतु अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एरवी मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल-मे दरम्यान चक्रीवादळांची निर्मिती झालेली दिसते. यंदा मात्र मे महिन्याच्या मध्यावर पहिलं वादळ अरबी समुद्रात निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर झाले तर त्याला ‘तौकते’ हे नाव देण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे. म्यानमारनं सुचवलेलं हे नाव आहे.

- Advertisement -

 

के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी मंगळवारी केलेल्या ट्विट मध्ये , दक्षिण अरबी समुद्रात १५ मे च्या आसपास चक्रीवादळाची शक्यता असून ते चक्रीवादळ उत्तर,पश्चिमकडे सरकण्याची देखील शक्यता आहे, असे म्हटले आहे. केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टी च्या भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील मच्छिमारांना व बोटींना सुखरूप परतण्यासाठी सावधानतेचा इशारा दिला आहे .

- Advertisement -

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळामुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रासह पश्‍चिम किनारपट्टीला धोका नसला तरी याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -