घरमहाराष्ट्रही मशाल अन्याय आणि गद्दार जाळणारी; उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

ही मशाल अन्याय आणि गद्दार जाळणारी; उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधताना शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिळालेल्या निवडणूक चिन्हाचे महत्त्व पटवून दिले. तुम्ही सर्व आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे

मुंबई : ही मशाल अन्याय आणि गद्दारी जाळणारी आहे. तिचे महत्त्व आणि तेज लक्षात घ्या, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मशाल हाताळताना उत्साहाच्या भरात काही चूक होऊ देऊ नका, असे आवाहन मंगळवारी शिवसैनिकांना केले.

भारत निवडणूक आयोगाने काल सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह दिले. या पार्श्वभूमीवर अंधेरीतील शिवसैनिक आज हातात मशाल घेऊन मातोश्रीवर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधताना शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिळालेल्या निवडणूक चिन्हाचे महत्त्व पटवून दिले. तुम्ही सर्व आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मशालीचे  महत्त्व, तेज, धोके लक्षात घ्या. मशाल हाताळताना उत्साहाच्या भरात काही चूक होऊ देऊ नका, असे ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

सोनिया गांधींचे मानले आभार

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करून आभार मानल्याची माहिती कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. भाजपचे राजकारण पाहिले तर ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र ताब्यात घेतला आहे त्यावर  जनता नाराज आहे. या नाराजीचा परिणाम या निवडणुकीमधून समोर येईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. त्याची निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत. शिंदे गटाकडून भाजपाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचाः अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सोनिया गांधींनी केला उद्धव ठाकरेंना फोन

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -