बिनडोक व्यक्ती पदावर नकोच, राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरवा : उद्धव ठाकरे

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मला वाटतं राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवले गेले. केवळ माझा माणूस म्हणून बिनडोक व्यक्तीला पदावर बसवता कामा नये, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

mahavikas aghadi long march against shinde fadavis govt on 17 december

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मला वाटतं राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवले गेले. केवळ माझा माणूस म्हणून बिनडोक व्यक्तीला पदावर बसवता कामा नये, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. आम्ही राज्यपाल हटवण्यासाठी काही अवधी दिला आहे. त्या दरम्यान काही घडलं नाही तर आम्ही भूमिका घेणारच आहोत. महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देणारच आहोत, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला आहे. ()

सेवालाल महाराज याचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. “राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयुक्तांच्या नेमकी विषयीची याचिका दाखल करण्यात आली आहे. मला वाटतं राज्यपालांची नियुक्तीही कोणत्या निकषावर व्हावी हे ठरवलं पाहिजे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

“उगाच माझ्या आजूबाजूचे आहेत म्हणून कुणालाही राज्यपाल करू नये. राज्यपाल पदावर त्या दर्जाचीच लोकं पाहिजे. केवळ माझा माणूस आहे. मग तो बिनडोक असला तरी चालेल पण मी राज्यपाल म्हणून पाठवेल, असं चालणार नाही. महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आम्ही लवकरच त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहोत”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

उदयनराजे यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी उदयनराजे यांचे आभार यावेळी मानले. ते म्हणाले की, “उदयनराजे यांना मी खास धन्यवाद देईल. या मुद्द्यावर भाजपमधील सुद्धा छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. तशी सुरुवात झाली आहे. आम्ही अवधी दिला होता. चांगलं सांगून राज्यपाल जात नसेल तर महाराष्ट्र काय आहे दाखवण्याची वेळ आली आहे”

शिवाय, “घाईघाईने काही केलं असं होऊ नये म्हणून थांबलो होतो. नाही तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. महाराष्ट्र बंद व्हावा ही सर्वांची भूमिका आहे. लवकरच कार्यक्रम जाहीर करू”, असेही ठाकरेंनी म्हटले.


हेही वाचा – कुठल्याही बाजूने आरे झालं तर महाराष्ट्राकडून कारे करणार; आशिष शेलारांचा इशारा