घरमहाराष्ट्रस्वबळ हे अभिमानाचे स्वाभिमानाचे असावे

स्वबळ हे अभिमानाचे स्वाभिमानाचे असावे

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे काँग्रेसला खडेबोल

महाविकास आघाडी सरकारमध्ये असूनही स्वबळाची भाषा करणार्‍या काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खडेबोल सुनावले. आम्हीही स्वबळाची भाषा करू शकतो, असे सांगत त्यांनी आघाडीचा धर्म जपण्यास काँग्रेस पक्षाला बजावले. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा देणार्‍या काँग्रेसला टोला लगावला. स्वबळ हे अभिमानाचे, स्वाभिमानाचे असावे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच, तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा अप्रत्यक्षपणे इशारा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिला.

अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणे असे नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असे सांगतानाच कोरोनाचे संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटले तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. स्वबळाचा नारा काय देता? माझ्या रोजी रोटीचं काय? तू पुढे चालला माझं काय? असे लोक विचारतील, तेव्हा काय करणार?

- Advertisement -

अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे. आपले बळ असायलाच हवे. स्वत:चे बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिले आहे. मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होते. मात्र, बाळासाहेबांनी अंगार फुलवला. मराठी माणसाला स्वाभिमान दिला. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचे, न्याय हक्काचे स्वबळ होय. तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा. माझ्यासाठी स्वबळ हे आहे. निवडणुका तर होत असतात. जिंकणे हरणे होतच असते; पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक असते, असे ते म्हणाले.

आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे. आम्ही भलत्यासलत्याच्या पालख्यांना खांदा देणार नाही. त्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही. पायात फाटके जोडे घालू; पण आम्ही आमच्याच पायांवर खंबीरपणे उभे राहू, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. आमचे हिंदुत्व संकुचित नाही. शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडले का, असे विचारले जाते. हिंदुत्व हे नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, श्वास आहे. त्यामुळे गैरसमज करू नका, युती तोडली, आघाडी केली, किती टिकणार वगैरे, त्याची काळजी करू नका. आमचा हेतू प्रामाणिक आहे. राज्याचा विकास करणे, गोरगरिबांचा आशीर्वाद मिळवणे. त्यासाठी काही करत असू तर हे सोडले आणि ते धरले असा त्याचा अर्थ होत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

जेव्हा शिवसेनेवर संकुचितपणाचे, प्रांतवादाचे आरोप झाले तेव्हा देखील शिवसेनाप्रमुख पुढे गेले. संकटाला घाबरला तर तो शिवसैनिक कसला? संकटाच्या छाताडावर चाल करून जाणे ही आमची शिकवण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. गेल्या निवडणुकीत जे दुर्दैवाने पराभूत झाले त्यांच्याशी मी संवाद साधला. त्यांना मी सांगितले पराभूत शब्द काढा, जो खचला तो संपला. आपल्या भारताचा पाया हा संघराज्याचा भाषावार प्रांत रचनेचा आहे हे आपण विसरता कामा नये. हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्त्व! सर्वप्रथम देशाभिमान मग प्रादेशिक अस्मिता असे ते म्हणाले. टीका करणारे तुम्ही काहीही केले तरी टीका करणार. तुमच्या मनाला जे पटते ते करा. पूर्वी या खिडक्या बंद होत्या, शिवसेनेने मराठी माणसे तिथे घुसवली. मनगट आहेत पण त्यात ताकद नाही तर फायदा नाही. मराठी माणसाला शिवसेनाप्रमुखांनी तुझ्या मनगटात ताकद आहे तलवार पेलवण्याची, ही जाणीव करून दिली तेव्हा मराठी माणूस पेटून उठला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप सत्तेसाठी कासावीस
‘भाजप सत्तेसाठी कासावीस झाला आहे. ज्यांना सत्तेची पोटदुखी झाली आहे. त्यांना मीच राजकीय औषध देणार आहे’, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. ‘मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून मी आज बोलतोय. मी 55 वर्षांच्या वाटचालीचे श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना जाते. या सर्व शिवसैनिकांना माझे अभिवादन. माझ्या शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. अशा शुभेच्छा देतानाच गेल्या दीड वर्षात आपले काम बोलतेय. अनेकांच्या पोटात दुखतेय. सत्ता नाही म्हणून पोटात दुखतेय, ते त्यांचे त्यांनी पाहावे, त्यांना औषध मी नाही देणार. पण, राजकीय औषध मीच देईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -