घरताज्या घडामोडीबेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले जातेय : नाना पटोले

बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले जातेय : नाना पटोले

Subscribe

देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई (Inflation) वाढत असून, या वाढत्या महागाईच्याय पार्श्वभूमी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी विरोधी पक्ष भाजपावर (BJP) टीका केली आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई (Inflation) वाढत असून, या वाढत्या महागाईच्याय पार्श्वभूमी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी विरोधी पक्ष भाजपावर (BJP) टीका केली आहे. ‘बेरोजगारी, महागाई याच्या कचाट्यातून जनता बाहेर निघायला तयार नाही, असे सर्व प्रश्न असताना मोदी मीडियाला (Modi Media) यामध्ये रस नसेल, तर कॉग्रेसला त्यामध्ये कुठलाही रस नाही’, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. तसेच खासदार नवनीत राण या नागपुरात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यावरही नाना पटोले यांनी टीका केली आहे. ‘हनुमान चालिसा मी सकाळी घरी वाचून निघतो आणि ही आस्था आहे. आमचा धर्म आम्हाला हे शिकवते, त्यांच्या धर्म त्यांना काय शिकवतो हे काय माहिती हे जाणून घेण्यात मला त्याच्यात रस नाही’, असे त्यांनी म्हटलं.

मुळ प्रश्नाकडे दुर्लक्ष

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, “हनुमान चालिसा मी सकाळी घरी वाचून निघतो आणि ही आस्था आहे. आमचा धर्म आम्हाला हे शिकवते, त्यांच्या धर्म त्यांना काय शिकवतो हे काय माहिती हे जाणून घेण्यात मला त्याच्यात रस नाही. पण मुळ प्रश्न देशासमोर असून, त्याकडे दुर्लक्ष केले जातेय. केंद्रातल्या मोदी सरकारला गुरूवारी 8 वर्ष पूर्ण झाली. आणी मागील 8 वर्षात देश विकण्याचे काम सुरू झालेय. देशाचे संविधानीक व्यवस्था संपवण्याचे काम सुरू झाले. बेरोजगारी, महागाई याच्या कचाट्यातून जनता बाहेर निघायला तयार नाही, असे सर्व प्रश्न असताना मोदी मीडियाला यामध्ये रस नसेल, तर कॉग्रेसला त्यामध्ये कुठलाही रस नाही.”, असे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

“मी गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान चालिसा पठण करतोय. आणि हा आस्थेचा विषय आहे, आणि या विषयाचा प्रचार केला जातोय त्याच्याबद्दलची काय प्रतिक्रिया देण्याच कारण नाहीच.”, असा टोलाही यावेळी नाना पटोले यांनी राणा दाम्पत्याला लगावला.

हेही वाचा – Aryan Khan Drugs Case : कॉर्डिलियासह समीर वानखेडेंच्या सर्व कारवायांची चौकशी करावी, अतुल लोंढेंची मागणी

- Advertisement -

वानखेडे हा केंद्रीय तपास यंत्रणेचा पोपट

क्रूझ ड्रग्ज पार्डी प्रकरणी एनसीबीच्या आरोपपत्रात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. यानंतर प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी तपास योग्य केल्याने त्यांच्यावर केंद्र सरकारने कारवाई करण्यास सांगितले. याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. “कॉग्रेसने आपली भुमिका केंद्रीय तपास यंत्रणेचा सातत्याने दुरूपयोग होतोय, याबाबत अगोदरच मांडली होती. आर्यन खानबाबतही कॉग्रेसने आपली भुमिका त्यावेळी स्पष्ट केली होती. पण मी सांगतो की, वानखेडेवर कोणतीही कारवाई होणार नाही, कारण वानखेडे हा केंद्रीय तपास यंत्रणेतला एक पोपट होता. आणि या पोपटावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही हे आपल्याला पुढच्या काळात दिसून येईल.”, असे नाना पटोले यांनी म्हटले.


हेही वाचा – मनसैनिकांकडून बृजभूषण यांच्याविरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -