घरनवी मुंबईUran Illegal Grampanchayat : उरण तालुक्यात 31 वर्षांपासून बेकायदा ग्रामपंचायत

Uran Illegal Grampanchayat : उरण तालुक्यात 31 वर्षांपासून बेकायदा ग्रामपंचायत

Subscribe

रायगड जिल्हा परिषदेने कानावर हात ठेवत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे दस्तावेज नाहीत असे माहिती अधिकारात स्पष्ट केले. शेवा कोळीवाडा विस्थापितांची ही ग्रामपंचायत 1993 अस्तित्वात असून ती कुणी जन्माला घातली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

उरण : रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यात जेएनपीटी बंदराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शेवा कोळीवाड्याचे पुनर्वसन करण्याचे ठरले होते. ते पुनर्वसन झाले नाही पण ज्या 256 कुटुंबांना उरण नगरपालिकेच्या बोरीपाखाडी गावात संक्रमण शिबिरात ठेवले ती वस्ती पुढे हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत म्हणून नावारुपाला आली. ही ग्रामपंचायत बेकायदा असून ती बंद करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. गंभीर बाब म्हणजे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत संदर्भात कुठलेही दस्तावेज नाहीत, अशी कबुली रायगड जिल्हा परिषदेने दिली आहे. त्यामुळे उरण नगरपालिका हद्दीतच 31 वर्षांपासून बेकायदा ग्रामपंचायत अस्तित्वात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शेवा कोळीवाड्यातील 256 कुटुंबांचे उरण नगरपालिकेच्या हद्दीत 17 हेक्टरवर पुनवर्सन केले जाणार होते. पण जेएनपीटीने कमी निधी दिल्याने 1986 मध्ये 17 हेक्टरऐवजी 2 हेक्टरवर भराव टाकून 256 कुटुंबांसाठी संक्रमण शिबिर बांधले. हे सर्व कुटुंब आजही याच संक्रमण शिबिरात राहात आहेत. या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद तसेच सरकाराकडे अनेक वर्षे फेऱ्या मारल्या पण कुणीही जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे शेवा कोळीवाड्यातील शेकडो कोळी बांधव आणि शेतकऱी कुटुंबांना तीन दशकांनंतरही संक्रमण शिबिरात आयुष्य काढावे लागले.

- Advertisement -

हेही वाचा… Alibaug Raigad Crime : विवाहबाह्य संबंधांसाठी आईकडूनच दोन चिमुरड्यांची हत्या

विशेष म्हणजे माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा स्थापन झालेली नाही, अशी स्पष्ट कबुली रायगड जिल्हा परिषदेने 11 मार्च 2024 च्या पत्रातून दिली आहे. विशेष म्हणजे 1993 पासून ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा येथे निवडणुका होत आहेत, सरपंच निवडला जातो. ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी वसुली करते. ग्रामस्थांकडे सातबाराचे उतारे नाहीत. जर ग्रामपंचायत बेकायदा असेल तर करवसुलीही बेकायदा ठरते.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Rasayani News : हाल, गैरसोयीचे नाव रसायनी रेल्वे स्टेशन

त्यामुळे ही करवसुली परत करावी, या मागणीसाठी शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेने ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाकडे पत्र लिहून बेकायदा करवसुली परत करण्याचे आदेश ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांना द्यावेत, अशी मागणी केली आहे.

ग्रामस्थांची मागणी

सरकारने ही ग्रामपंचायत बंद करावी आणि हे गाव जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावे, अशी मागणी दस्तुरखुद्द ग्रामपंचायत हनुमान कोळीवाड्याचे सरपंच परमानंद कोळी यांनी केली आहे. ही बेकायदा ग्रामपंचायत स्थापन करणारे तत्कालीन सरकारी अधिकारी आणि पहिले सरपंच पांडुरंग लक्ष्मण कोळी यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कोळी यांनी केली आहे. दोन वर्षांपासून लोकांना वास्तव कळू लागल्याने त्यांनी घरपट्टी तसेच पाणीपट्टी भरणे बंद केले आहे. मुळात उरण नगरपालिका हद्दीत हे संक्रमण शिबीर आहे. तर त्याची वेगळी ग्रामपंचायत कशी होऊ शकते, असा सवाल सरपंच परमानंद कोळी यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -