घरमुंबईRaj Thackery : मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून...; राज ठाकरेंची उद्धव ठाकरे...

Raj Thackery : मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून…; राज ठाकरेंची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका

Subscribe

मुंबई : मनसे भाजपा, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी जाहीर करतो, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आजच्या मेळ्याव्यात मांडली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. (Because I didn’t get the Chief Ministership Raj Thackeray criticizes Uddhav Thackeray and Sanjay Raut shivaji park )

राज ठाकरे म्हणाले की, आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. कारण त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून. पण मी नरेंद्र मोदी यांना मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाही तर त्यांच्या काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना त्यावेळी नरेंद्र मोदींच्या भूमिका पटत नव्हती तर त्यांनी त्यांचे राजीनामे खिशात न ठेवता माझ्याबरोबर मैदानात उतरायला हवं होतं. पण तेव्हा ते सत्तेचा मलिदा खात राहीले, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – MNS : डॉक्टर मतदारांची नाडी तपासणार की नर्स डायपर बदलणार? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा

राज ठाकरे म्हणाले की, एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची आणि महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे मी पाहत नाही. आजपर्यंत रोखठोक भूमिका घेत आलो आहे आणि यापुढेही घेत राहीन. मी समर्थन आणि पाठिंबा देताना मनापासून देतो आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा करतो. मी मुख्यमंत्री एखनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर मी स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली.

- Advertisement -

राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले की, मला ते सगळं नको, मला या सगळ्या वाटाघाटीच्या भानगडीत पाडू नका. मला विधानपरिषद किंवा राज्यसभाही नको. पण या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. ती गरज पूर्ण झाली नाही तर राज ठाकरेचे तोंड आहे, हे फडणवीसांना मी स्पष्टपणे सांगितलं. केवळ देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे म्हणून काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी जाहीर करतो, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आजच्या मेळ्याव्यात मांडली.

हेही वाचा – Raj Thackery : फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -