Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 93 Oscar award 2021: ऑस्कर सोहळ्यात वेशभूषाकार भानू अथय्या आणि अभिनेता इरफान...

93 Oscar award 2021: ऑस्कर सोहळ्यात वेशभूषाकार भानू अथय्या आणि अभिनेता इरफान खानला वाहिली आदरांजली

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक सोहळे हे ऑनलाइन रित्या पार पडत आहेत. तसेच सोहळ्यांचे आयोजनही अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत होत आहेत.

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक सोहळे हे ऑनलाइन रित्या पार पडत आहेत. तसेच सोहळ्यांचे आयोजनही अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत होत आहेत. नुकताच 93 वा ‘ऑस्कर अवॉर्ड’ सोहळा पार पडण्यात आला. या सोहळ्यात दिवंगत बॉलिवूड अभिनेते इरफान खान तसेच जगविख्यात वेशभूषाकार भानू अथय्या यांना आदरांजली वाहण्यात आली. गेल्या वर्षी दोघांचे निधन झाले होते. यांच्या निधंनानंतर बॉलिवूड मध्ये तसेच चाहत्यानमध्ये शोककळा पसरली होती.
देशातील प्रत्येक चित्रपटसृष्टीची ऑस्कर पुरस्कारवर नजर असते. मनाच्या मानल्या जाणार्‍या ऑस्कर सोहळा काल संध्याकाळी अमेरिकेमधील लॉस एंजलस मध्ये पार पडला. या सोहळ्यात जगभरातील विविध कलाविष्कारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा पुरस्कार सोहळ्याच्या रूपरेषेत मोठे बदल करण्यात आले होते. कारण यंदाचा सोहळा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे दरवर्षी प्रमाणे ऑस्कर सोहळा पार पडला. या ऑस्कर सोहळ्यादरम्यान कलाविश्वातील अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

- Advertisement -

 

- Advertisement -

यंदाच्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘नोमॅडलँड’ याने बाजी मारली. तर याच चित्रपटाने आणखीन दोन महत्वाच्या पुरस्कारवर आपले नाव कोरले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री Frances McDormand आणि दिग्दर्शक Chloé Zhao’ पुरस्कार देखील ‘नोमॅडलँड’ चित्रपटाने खिशात घातल आहेत.


हे हि वाचा – 93 oscar award 2021: ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात ‘या’ कलाकारांनी मारली बाजी

- Advertisement -