घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'वरणभात खातांनाही आता विचार करावा लागणार'; तूरडाळ तीन महिन्यात ४० रूपयांनी महागली

‘वरणभात खातांनाही आता विचार करावा लागणार’; तूरडाळ तीन महिन्यात ४० रूपयांनी महागली

Subscribe

नाशिक : डाळी आणि कडधान्यांच्या किंमती ही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे साधा वरणभात करतांनाही गृहिणींना विचार करावा लागणार आहे. किरकोळ बाजारात जानेवारी महिन्यात ११० रूपयांना विकली जाणारी तूरडाळीचे दर १५० रूपये किलोपर्यंत जाऊन पोहचले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पीके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भाजीपाला आधीच महाग झाला आहे. तर आता डाळी ही महाग झाल्याने घरात खावे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या दरवाढीमुळे किचन बजेट मात्र कोलमडून जाणार आहे.

गत हंगामात तुरीचे घटलेले उत्पादन, मार्च, एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होऊन त्याचा परिणाम दरवाढीवर झाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. जानेवारीपर्यंत तूरडाळीचे दर ११० रूपयांपर्यंत होते. एप्रिलपासून ३० ते ४० रूपयांनी वाढ झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १५० रूपये पर्यंत जाउन पोहचले आहेत. नवीन माल येईपर्यंत हे दर चढेच राहतील असे व्यापार्‍यांनी सांगितले. पाऊस सुरू होऊन पेरण्या वेळेत झाल्या तर डाळींचे भाव उतरतील. सध्या तरी ऑक्टोबरपर्यंत दर तेजीत राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारतात म्यानमार, सुदान आणि दक्षिण आफ्रिकेतून तुरीची आयात होते. सरकारने आयात शुल्क हटवून आयात खुली केली तरीही पुरेशी आयात झाली नाही. सुदानमधूनही आयात थंडावली आहे.

- Advertisement -

अन्य डाळीही तेजीत

तूरडाळी पोठोपाठ मुगडाळीचे दरही ११५ रूपयांवर गेले आहेत. साधी डाळ १०५ रूपये किलो दराने विकली जात आहे. उडीदडाळ साधी १०५ रूपये तर उत्कृष्ठ दर्जाची १२० रूपये किलो. हरबराडाळीचे दरही ७५ रूपयांवर स्थिर आहेत. मसूरडाळ ९० रूपयांवर असून किलोमागे १० ते १२ रूपयांनी वाढ झाल्याचे व्यापारयांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -