घरताज्या घडामोडीग्रामपंचायतींसाठी 13 ऐवजी आता 16 ऑक्टोबरला होणार मतदान

ग्रामपंचायतींसाठी 13 ऐवजी आता 16 ऑक्टोबरला होणार मतदान

Subscribe

येत्या काळाता विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या मतमोजणी तारखेत बदल करण्यात आला आहे.

मुंबई : येत्या काळाता विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या मतमोजणी तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, 13 ऑक्टोबर ऐवजी होणारी ही निवडणुकीचे मतदान आता 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. (Voting for Gram Panchayats will be held on October 16 instead of October 13)

या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, निवडणुक 16 ऑक्टोबर रोजी होणार असून, मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर होणार आहे.

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगाने 7 सप्टेंब रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.

नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. ग्रामीण भागात गाव पातळीवर राजकीय रंग वाढलेला दिसून येत असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच सर्वच पक्ष संघटनेतून उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली आहे. उमेदवारांकरिता गावोगावी फिरून आवश्यक कागदपत्रे जमा करतानाचे चित्र दिसत आहे.


हेही वाचा – उदे गं अंबे उदे! नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -