घरताज्या घडामोडीपाणीसंकट : जिल्ह्यात २५५ टँकरच्या ५३८ फेर्‍यांद्वारे पाणीपुरवठा

पाणीसंकट : जिल्ह्यात २५५ टँकरच्या ५३८ फेर्‍यांद्वारे पाणीपुरवठा

Subscribe

एकीकडे जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअस हुन पुढे जात असताना दुसरीकडे दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न देखील जटील बनला आहे. जिल्ह्यातील २३३ गावे व ५३५ वाड्यांवरील चार लाख ८० हजार १३६ नागरिक व दोन लाख जनावरांची २५५ टँकरच्या ५३८ फेर्‍यांद्वारे तहान भागवली जात आहे. यातच जिल्ह्यातील धरणांची पातळी खालावत चालली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत असून, टंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. जिल्ह्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे धरणे, छोट्या- मोठ्या तलावांमध्ये पुरेसा पाणी साठा झालेला नाही. तसेच, दिवसेंदिवस उन्हाळा अधिक वाढत असल्याने भूगर्भातील पाणीपातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. जिल्ह्यातील काही गावांना गत वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली. एप्रिल च्या दुसर्‍या आठवड्यात टँकरची संख्या २५५ वर पोहोचली आहे.. जिल्ह्यात सद्यस्थितीत २३३ गावे आणि ५३५ वाड्या अशा ७६८ ठिकाणी २५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक ६४ टँकर नांदगाव तालुक्यात, तर ४५ टँकर येवला तालुक्यात तहान भागविण्याचे काम करीत आहेत. एप्रिलअखेर व मेमध्ये आणखी भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.नागरिकांनी देखील पाणी जपून वापरण्याची गरज आहे

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी – खरीप व रब्बी दोन्हीही हंगाम वाया गेल्याने बळीराजाचिंतेत आहेत. जनावरांना चारा उपलब्ध नाही. ज्या भागात पाणी उपलब्ध होते, तेथे रब्बीची काही पिके झाली आहेत. त्यामुळे थोडा कडबा उपलब्ध झाला. इतरत्र रब्बी हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे कडब्याचे दर कडाडले.ओला चारा तालुक्यात थोडाफार आहे. तालुक्यातील जनावरांची संख्या लक्षात घेता जनावरांना चारा व पाणी देणे सर्वसामान्य शेतकर्‍यांना परवडत नाही. प्रशासनाने दुष्काळाची दाहकता ओळखून गरज असेल तेथे जनावरांसाठी छावणीची मागणी पुढे येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी ११४ विहिरी अधिग्रहित – दुष्काळग्रस्त असलेल्या १२ गावांना तसेच १०३ ठिकाणी टँकरसाठी ११४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात बागलाण (३७), चांदवड (५), देवळा (२९), मालेगाव (३१), नांदगाव (४), सुरगाणा (२), येवला तालुक्यासाठी (६) विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. नांदगाव, येवला, चांदवडला सर्वाधिक टँकर – सर्वाधिक नांदगाव येथे ६४ टँकर , येवला ४५ टँकर ,मालेगाव ३६, चांदवड व देवळा २९ , सिन्नर १७ , सुरगाणा दोन इगतपुरी एक तर दिंडोरी, कळवण नासिक,निफाड, पेठ आणि त्र्यंबकेश्वर येथे एकही टँकर अद्याप पर्यंत सुरू नाही या ठिकाणी पाण्याची परिस्थिती ठीक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -