Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

Subscribe

पुण्यामध्ये काही भागात आधीच पाणी टंचाईचे संकट असताना आता पुणेकरांना गुरुवारी (ता. 31 ऑगस्ट) पाण्याविना राहावे लागणार आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याची माहिती पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे.

पुणे : पुण्यामध्ये काही भागात आधीच पाणी टंचाईचे संकट असताना आता पुणेकरांना गुरुवारी (ता. 31 ऑगस्ट) पाण्याविना राहावे लागणार आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याची माहिती पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तत्काळ दुरुस्तीचे काम केले जाणार असल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे या उपकेंद्रामार्फत करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ज्यामुळे पुणेकरांना आता पाणी जपून वापरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. (Water supply to ‘this’ area will be closed in Pune on Thursday)

हेही वाचा – Water shortage : राज्यात पावसाने मारली दडी, ‘या’ जिल्ह्यांत पाणीटंचाईचे संकट

- Advertisement -

गुरुवारी जरी पुण्यातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नसला तरी शुक्रवारी (ता. 1 सप्टेंबर) मात्र सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. ज्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध बावस्कर यांनी केलेले आहे. पर्वती जलशुद्धीकरण ष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र आणि भामा आसखेड जलकेंद्रात सुद्धा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्यावतीने तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने अनेक भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र परिसर, नवीन व जुले होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या खत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, एन.एन.डी.टी. MLR व HLR (SNDT MLR, HLR) परिसर व चतु:श्रृंगी टाकी परिसर व कोंढवे-धावडे जलकेंद्र, भावा आसखेड जलकेंद्र येथील वीजपुरवठा बंद राहणार असल्याने गुरुवारी या पंपींगच्या अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘या’ भागांतील पाणीपुरवठा राहणार बंद…

- Advertisement -

मध्यवर्ती भाातील सर्व पेठा, क्वार्टरगेट परिसर, गंजपेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर, स्वारगेट, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर 1 आणि 32, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, डायस प्लॉट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर, हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरूळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा, रेसकोर्स, मुळा रस्ता, खडकी, हरीगंगा सोसायटी, लोहगांव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, पाषाण, भूगाव रस्ता, बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, गुरूगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहसनगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, सूस रस्ता, रेणूकानगर, पॉप्युलर नगर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य महाविद्यालय परिसर, धनंजय सोसायटी, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, कालवा रस्ता, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रस्ता, विजनगर, दत्तनगर, कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक 1 ते 10, गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, विधी महाविद्यालय रस्ता, बीएमसीसी, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, वकीलनगर, करिष्मा सोसायटी, शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी, कोथरूड, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदानगर, जयभवानीनगर, केळेवाडी, आयडीयल कॉलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी, हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव, येवलेवाडी या सर्वच भागांमधील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

- Advertisment -