घरताज्या घडामोडीशिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देऊ : उद्धव ठाकरे

शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देऊ : उद्धव ठाकरे

Subscribe

शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देऊ, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट संकेत दिले. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे. याउलट आता मला बरे आहे. माझ्या तोंडावर मुख्यमंत्रिपदाचा मास्क नसल्याने मला मोकळेपणाने बोलता येणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देऊ, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट संकेत दिले. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे. याउलट आता मला बरे आहे. माझ्या तोंडावर मुख्यमंत्रिपदाचा मास्क नसल्याने मला मोकळेपणाने बोलता येणार आहे, असेही ठाकरे म्हणाले. (We will reply at the right time to those who talk about showing land to Shiv Sena says Uddhav Thackeray)

शिवसेना नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी बोलताना ठाकरे यांनी भाजपचा ठाकरे शैलीत समाचार घेणार असल्याचे सांगितले. भाजपचे नेते अमित शहा यांनी काल भाजपच्या बैठकीत बोलताना शिवसेनेला जमिनीवर आणा, अशी टीका केली होती. त्याला ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

मला मुख्यमंत्रिपद हवे असते तर मी देखील आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. माझीही ओळख होतीच ना ममता बॅनर्जींशी. मी घेऊन गेलो असतो सगळ्यांना कलकत्त्याला. तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं. राजस्थानला कुठेतरी नेलं असतं. पण तो माझा स्वभाव नाही. राहायचं असेल तर निष्ठेनं राहायचं. मनात शंका-कुशंका घेऊन राहाणं याला राहाणं म्हणत नाही, असे मी सगळ्यांना सांगितले.आता जे आहेत ते मूठभर असले तरी चालतील,पण ते निष्ठावंत हवेत. आता जे सोबत आहेत ते कट्टर कडवट शिवसैनिक उरले आहेत. शिवसेना ही काही आपली खासगी मालमत्ता नाही, असेही ठाकरे म्हणाले.

मला जर मुख्यमंत्रिपद जर पाहिजे असते, तर मी एका क्षणात ते सोडू शकलो नसतो. आपल्याकडे 30-40 आमदार तेव्हा होतेच. मला मुख्यमंत्रिपदावर चिकटून राहायचे असते तर मी त्यांनाही डांबून ठेवू शकलो असतो, असा टोला ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला. निष्ठेने पक्षाचे काम केले तर उद्या चांगले दिवस दिसणार आहेत. अनेकांनी साथ सोडली म्हणून विचारावर आणि पक्षाच्या धोरणावर त्याचा परिणाम होणार नाही. अजूनही सगळयांना दरवाजे खुले आहेत. ज्यांना राहायचे आहेत ते राहतील. त्यांना जायचे आहेत ते जातील, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

आपल्याला दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. तेव्हा मला जे बोलायचे आहे ते बोलेनच. पण आता एक बरे आहे की आत्तापर्यंत मला बोलताना तोंडावर मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपूनच बोलावे लागायचे. आता यावेळी जे सूचेल, जे बोलायचे ते मी बोलेन, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेली गोष्ट उपस्थिताना ऐकवली.

साल्हेरचा किल्ला शिवाजी महाराजांनी जेव्हा जिंकला, तेव्हा मराठ्यांचे सैन्य जेमतेम होते आणि मोगलांचे सैन्य लाखात होते. तरीही महाराज जिंकले. कारण त्यांच्यासोबत मूठभर का होईना, निष्ठावंत होते. तेव्हा पसाभर असूनही निष्ठावंतानी मोगलांना पाणी पाजले. त्यामुळे मला निष्ठावंत हवेत. ते तुम्ही दिसता आहात. मला समाधान हे आहे की आत्ता माझ्यासोबत असणारे कट्टर, कडवट, निष्ठावान शिवसैनिक आहेत आणि हेच आपल्या शिवसेनेचं वैभव आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

आपण अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना नेते केले आहे. आणखी नेत्यांचीच नाही, पण सगळ्यांचीच टीम सावकाशपणे मी वाढवणार आहे.भास्कर जाधवांना विचारपूर्वक नेतेपद दिले आहे. कारण आता आपल्याला लढायचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.


हेही वाचा – वर्षा उसगावकरांनी माफी मागावी अन्यथा सडके मासे खाऊ घालू; संतापलेल्या कोळी महिलांचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -