घरमहाराष्ट्रमध्य रेल्वे तोंडघशी; हवामान विभागाकडून स्पष्टीकरण

मध्य रेल्वे तोंडघशी; हवामान विभागाकडून स्पष्टीकरण

Subscribe

'हवामान खात्याकडून रेल्वे प्रशासनाला पावसासंदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नव्हती. याशिवाय ३ जुलैला मुसळधार पाऊस पडणार नाही, अशी देखील माहिती देण्यात आली होती', असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे तोंडघशी पडली आहे.

पावसाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने बुधवारी रविवारचे वेळापत्रक लागू केले होते. हवामान खात्याच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले होते. मात्र, ‘हवामान खात्याचा याच्याशी काहीही संबंध नाही’, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे पुन्हा एकदा तोंडघशी पडली आहे. याशिवाय नेमका त्यादिवशी पाऊस पडलाच नाही. उलट मध्य रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली, ठाणे इत्यादी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांनी मध्य रेल्वेवर प्रचंड टीका केली.

हवामान खात्याचे स्पष्टीकरण

हवामान विभागाच्या माहितीनुसार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे वेळापत्रक रविवारच्या दिवसासारखे ठेवण्याते आल्याचे मध्य रेल्वेने बुधवारी जाहीर केले होते. मात्र, ‘हवामान खात्याने पावसासंदर्भात कोण्त्याही प्रकारची माहिती मध्य रेल्वेला दिली नव्हती’, अशी माहिती खुद्द हवामान खात्याचे उप महासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केली. याशिवाय ‘३ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडणार नाही’, अशी देखील माहिती देण्यात आली होती. ‘अधिक माहितीसाठी हवामान विभागाची वेबसाईटला भेट द्या’, असेही होसाळीकर म्हणाले. त्यामुळे मध्य रेल्वेचा गलथापणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

- Advertisement -

प्रवासी लोकलमधून पडल्यावर रेल्वेला आली जाग

कमी लोकल गाड्या धावल्यामुळे मध्ये रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवपर प्रवाशांची प्रचंड गर्दी निर्माण झाली. या गर्दीमुळे तीन प्रवासी मुंब्रा-कळवा दरम्यान रेल्वेमधून खाली पडले. तर दोन महिलांना भोवळ आली. या सर्व घडामोडीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाचे डोके ठिकाणावर आले आणि नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या सोडायला सुरुवात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -