घरमहाराष्ट्रएवढं स्वागत केल्यावरही विदर्भाला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल

एवढं स्वागत केल्यावरही विदर्भाला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल

Subscribe

Uddhav Thackeray | विधिमंडळाच्या अधिवेशनात विदर्भाताबाबत काहीच ठोस उपाययोजना जाहीर झालेल्या नाहीत. या अधिवेशनाचा अजून दीड दिवस उरला आहे. त्या काळात तरी विदर्भाबाबत काही ठोस निर्णय होतील का हे पाहावं लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

नागपूर – दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले. त्यामुळे विदर्भातील प्रश्नांवर चर्चा केली जाईल असे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चाच झाली नाही, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी नागपुरात आज माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा आधार देतायत की गाढतायत यावर विचार करा, शिंदे गटातील मंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा सल्ला

- Advertisement -

विदर्भातील समस्यांवर चर्चा व्हावी, तेथील प्रश्न सोडवले जावेत याकरता हिवाळी अधिवेशन नागपुरात करण्याचा नियम आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे हिवाळी अधिवेशन नागपुरात होऊ शकले नाही. यंदा कोरोनाचा संसर्ग अटोक्यात असल्याने दोन वर्षांच्या खंडानंतर हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडत आहे. राज्यातील मंत्रिमंडळ आणि लोकप्रतिनिधींची फौज नागपुरात दाखल आहे. सर्व मंत्रिमंडळ आणि लोकप्रतिनिधींचं स्वागत करण्याकरता नागपुरात भलेमोठे होर्डिंग्सही लागले आहेत. एकप्रकारे विदर्भवासीयांकडून लोकप्रतिनिधींचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे. विदर्भाने एवढं स्वागत करूनही विदर्भाला तुम्ही काय दिलं? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी आज उपस्थित केला.

विधिमंडळाच्या अधिवेशनात विदर्भाताबाबत काहीच ठोस उपाययोजना जाहीर झालेल्या नाहीत. या अधिवेशनाचा अजून दीड दिवस उरला आहे. सरकारने विदर्भवासियांच्या भावना लक्षात घेऊन घोषणा जाहीर कराव्यात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच, पुरवणी मागण्यातील ५२ हजार कोटी रुपयांची अंमलबजावणी कुठे, कशी करणार हेही सरकारने सांगावं, असं ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा विरोधकच विचारतात, सत्तारांचा राजीनामा कुणीच का नाही मागितला?

शिंदे गटाची बुभूक्षित नजर 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरातील रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातील डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. यावरूनही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आता हे लोक आरएसएसवरही ताबा मिळवतील, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. आरएसएस हा मजबूत आहे त्यामुळे ते ताबा मिळवू शकत नाहीत, मात्र आरएसएसने आता सावध राहायला हवं, असंही मिश्किलीत म्हटलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -