घरताज्या घडामोडीमिशी कधी काढणार? संतोष बांगरांच्या 'त्या' चॅलेंजवर अयोध्या पौळ यांचा सवाल

मिशी कधी काढणार? संतोष बांगरांच्या ‘त्या’ चॅलेंजवर अयोध्या पौळ यांचा सवाल

Subscribe

शिवसेना नेते संतोष बांगर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच राज्यात पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांबद्दल संतोष बांगरांनी वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी कळमनुरी येथील १७ पैकी १७ जागांवर विजय मिळवणार, १७ जागा जिंकणार नाहीतर मिशी काढेन, असे चॅलेंज दिले होते.

शिवसेना नेते संतोष बांगर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच राज्यात पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांबद्दल संतोष बांगरांनी वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी कळमनुरी येथील १७ पैकी १७ जागांवर विजय मिळवणार, १७ जागा जिंकणार नाहीतर मिशी काढेन, असे चॅलेंज दिले होते. मात्र त्यांच्या विजयाचा आत्मविश्वास फोल ठरल्याने ते आता मिशी काढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच ठाकरे गटाच्या युवा महिला नेत्या अयोध्या पौळ यांनी व्हिडिओ शेअर करत आमदार संजय बांगर यांना प्रश्न केला आहे. (when will MLA bangar moustache Shiv Sena Ayodhya Paul has brought a gift)

नेमके काय म्हणाल्या अयोध्या पौळ?

- Advertisement -

आता, मिशी कधी काढणार? असा प्रश्न पौळ यांनी विचारला आहे. तसेच, मी सकाळीच एक गिफ्ट घेऊन आलेय, त्यासाठी २० रुपयेही खर्च केलेत, असे म्हणत अयोध्या पौळ यांनी व्हिडिओत शेविंग इरेजर आणल्याचे दाखवले.

नेमकं काय घडलं?

- Advertisement -

राज्यातील अनेक जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात, आमदार बांगर यांच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील निवडणूकही झाली. कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतील केवळ ५ जागा मिळाल्या.

महाविकास आघाडीने १२ जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत निकाल त्यांच्याच विरोधात गेला आहे. महाविकास आघाडीन १२ जागेवर दणदणीत विजय मिळवला.

या निवडणुकांच्या प्रचारापूर्वी आमदार बांगर यांनी एका सभेत बोलताना, येथे १७ पैकी १७ जागा जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता. विशेष म्हणजे १७ जागा न जिंकल्यास मिशी ठेवणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.


हेही वाचा – हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले; संजय राऊतांनी भाजप नेत्यांविरुद्ध केली चौकशीची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -