पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर, कुठे कुठे देणार भेटी?

PM Narendra Modi Mumbai Visit | आगामी पालिका निवणडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईला लक्ष्य केलं असल्याने मोदींनी मुंबईला महत्त्व दिलं आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. त्यांचा आगामी दौरा कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

rojgar mela pm narendra modi to distribute 71000 appointment letters to new recruits today

PM Narendra Modi Mumbai Visit | मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मागच्या वेळेप्रमाणेच ते यावेळीही मुंबईच्या विविध भागांना ते भेटी देणार आहेत. महिन्याभरात दुसऱ्यांदा ते मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आगामी पालिका निवणडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईला लक्ष्य केलं असल्याने मोदींनी मुंबईला महत्त्व दिलं आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. त्यांचा आगामी दौरा कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर; पोलीस अलर्ट मोडवर तर, ‘या’ गोष्टींवर असणार बंदी

अंधेरी पूर्व येथे दाऊदी बोहरा समाजाच्या अरबी अकादमीच्या उद्घाटनासाठी ते येथे येणार आहेत. यावेळी बोहरा समाजाचे सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्यासोबत मोदी एकाच व्यासपीठावर येतील. तसंच, मोदी मुंबईतील कुलाबा येथील भारतीय नौदल तळालाही भेट देणार आहेत. तर, मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसला मोदींच्या हस्ते हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच १९ जानावेरी रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. मेट्रो २ए आणि ७ चे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले होते. तसंच, वांद्रे कुर्ला संकूल येथील भव्य मैदानावरून त्यांनी मुंबईकरांनाही संबोधित केलं होतं. आता पुन्हा ते १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याने मुंबईकर त्यांच्या स्वागतासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. तसंच, त्यांच्या स्वागतासाठी सुरक्षेचीही तेवढीच काळजी घेणार असून पोलिसांकडून नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, १० फेब्रुवारी रोजी मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबईकरांसाठी मोदींचा दौरा फलदायी

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबई पोलिसांनी कलम 144 अंतर्गत अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मुंबई पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत काम करत आहेत.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार; 2 वंदे भारत एक्स्प्रेसना दाखवणार हिरवा झेंडा?

वंदे भारत एक्स्प्रेसची वैशिष्ट्य

वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई ते सोलापूर हा प्रवास केवळ साडे सहा तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मुंबई ते सोलापूर अंतर कापण्यासाठी आठ तास लागतात. तसेच सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधूनही पाच तास 55 मिनिटांचा प्रवास होणार आहे.

  • देशभरात चालवण्यात येणाऱ्या वंदे भारतची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे.
  • जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असणार आहेत.
  • प्रत्येक ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये 16 एसी डबे आहेत.
  • एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार 128 इतकी आहे.

मुंबई ते शिर्डी मार्गावर लवकरच धावणार ‘वंदे भारत’

सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस गुरुवार वगळता आठवड्यातील 6 दिवस धावणार असून 5 तास 55 मिनिटांचा प्रवास होणार आहे. सीएसएमटीतून सायंकाळी 6:15 वाजता सुटून रात्री 12:10 मिनिटांनी पोहोचणार आहे. दादर, ठाणे, नाशिक रोडला थांबा आहे.

सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस बुधवार वगळता आठवड्यातील 6 दिवस धावेल. सोलापूर येथून सकाळी 06:05 मिनिटांनी सुटून दुपारी 12:35 वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबणार आहे.