घरमहाराष्ट्रपुणे'आता शाब्बासकीची थाप कोण देणार'; गिरीश बापटांच्या निधनानंतर अभिनेत्री भावूक

‘आता शाब्बासकीची थाप कोण देणार’; गिरीश बापटांच्या निधनानंतर अभिनेत्री भावूक

Subscribe

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी आज पुण्यात दुखःद निधन झाले. राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट हे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविद जबाबदा-या पार पडल्या. आजही पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा दबदबा होता. त्यामुळे कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून ते निवडून आले होते.

गिरीष बापट यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींसह देशातली अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत आहेत. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने हिने सुद्धा गिरीश बापट यांना इंस्टाग्रामवर भावूक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये गिरीश बापट यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत ‘वडीलांसारखी माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणाऱ’ असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruchita Jadhav (@ruchitavijayjadhav)

- Advertisement -

रुचिता जाधवने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, “भाऊ.. तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले… आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही.. वडीलांसारखी तुमची माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणार… तुम्हाला विसरणे तर शक्यच नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ.”

- Advertisement -

गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास
आणीबाणीच्या काळात तुरंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. 1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली आणि पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळी निवडून आले. 1996 साली त्यांना भाजपने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळाले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काॅंग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -