घरमहाराष्ट्रहिवाळी सत्र २०१९ च्या परीक्षांच्या तारखा जाहीर

हिवाळी सत्र २०१९ च्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Subscribe

मुंबई विद्यापीठ परीक्षा विभागाने नियोजन पूर्ण कामकाजाची प्रचिती देत हिवाळी सत्र २०१९ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

मुंबई विद्यापीठ परीक्षा विभागाने नियोजनपूर्ण कामकाजाची प्रचिती देत हिवाळी सत्र २०१९ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, विद्यार्थींच्या माहितीसाठी www.mu.ac.in या विद्यापीठ संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहे. सायन्स अँड टेक्नॉलोजी (Science & Technology) विभागाच्या १२७, कॉमरस अँड मॅनेजमेंट (Commerce & Management विभागाच्या) १००, Humanities विभागाच्या ९५ तर interdisciplinary १४१ अशा एकूण तब्बल ४६३ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. B.E. आणि M.E. परीक्षांच्या तारखा सुध्दा या आडवडयात जाहीर होणार असून विद्यापीठ संकेतस्थळावर विद्यार्थींच्या माहितीसाठी प्रकाशित होणार आहेत.

हिवाळी सत्र २०१९ च्या परीक्षांचे वेळापत्रक नियोजनात परीक्षा विभागाच्या उपकुलसचिव पगारे तसेच सहकारी अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांचे सर्व महाविद्यालये यांच्याशी समन्वय तसेच परीक्षा प्रक्रीया राबविण्यासाठी आवश्यक शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांच्या आढावा बैठकी घेतल्या आहेत. सदर बैठकींच्या दरम्यान, लक्षात आलेल्या उणीवा आणि गरजा यांच्या अनुषंगाने संचालक परीक्षा मंडळ विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक आणि समन्वय साधणारे नियोजन करणे साध्य झाले आहे.

- Advertisement -

हिवाळी सत्र परीक्षा वेळापत्रकाच्या अनुषंगाने सर्व महाविद्यालयांनी अभ्यासक्रम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची काळजी घ्यावी जेणेकरून विद्यार्थींना रिव्हीजनसाठी वेळ मिळू शकेल. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, संचालक, मुंबई विद्यापीठ


हेही वाचा – शैक्षणिक शुल्क सरकार भरणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -