घरमहाराष्ट्रसुभाष देसाईंचा मुलगा शिंदेंसोबत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

सुभाष देसाईंचा मुलगा शिंदेंसोबत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे भगवा हातात घेत हा पक्षप्रवेश झाला. भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे देसाई कुटुंबात फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. बाळासाहेब आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून तिसरा शब्द माझ्यासमोर आलेला मला आठवत नाही. हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेले स्वप्न हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. ते वाढवत आहेत. यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही आधीपासून एकमेकांबरोबर काम केले आहे. मी एकनाथ शिंदे यांना काम करताना जवळून बघितले आहे. त्यांच्या कामाचा वेग आणि त्यांची निर्णयक्षमता पाहून मी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला, असे यावेळी भूषण देसाई यांनी सांगितले.


माझे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे काही सामाजिक कार्य आहे, ते मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून करीत होतो, पण आता एकनाथ शिंदे यांच्या नवीन सरकारचे काम बघून आणि त्यापासून प्रेरित होऊन मी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
-भूषण देसाई

- Advertisement -

माझा मुलगा भूषण देसाई याने शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व
मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही, मात्र येथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरूच ठेवणार आहे.
-सुभाष देसाई, नेते, शिवसेना (उबाठा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -