घरताज्या घडामोडीकार चालकाची महिलेला भररस्त्यात मारहाण; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल

कार चालकाची महिलेला भररस्त्यात मारहाण; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल

Subscribe

रस्त्यावर गाडी चालवताना वारंवार ओव्हरटेक केल्यास दोन वाहन चालकांमध्ये होणारे वाद नेहमीच पाहायला मिळतात. परंतु, एका महिला ओव्हरटेक महागात पडले आहे. कारण भररस्त्यात ओव्हरटेक केल्यामुळे वाहन चालकाने महिलेला मारहाण केली आहे.

रस्त्यावर गाडी चालवताना वारंवार ओव्हरटेक केल्यास दोन वाहन चालकांमध्ये होणारे वाद नेहमीच पाहायला मिळतात. परंतु, एका महिला ओव्हरटेक महागात पडले आहे. कारण भररस्त्यात ओव्हरटेक केल्यामुळे वाहन चालकाने महिलेला मारहाण केली आहे. ही घटना नागपूर शहरात घडली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केला आहे. (Woman Thrashed By Man While Overtaking His Car Supriya Sule Direct Question To DCM Devendra Fadnavis)

नेमकी घटना काय?

- Advertisement -

एका कारला महिलेने ओव्हरटेक केले. त्यामुळे प्रचंड संतापलेल्या कार चालकाने तिला भर चौकात बेदम मारहाण केली. शुक्रवारी ही धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

या प्रकारावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. सुप्रिया सुळे यांनी महिलेला मारहाण झालेला व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का? असा सवाल करत या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


हेही वाचा – गोपीनाथ मुंडे हे शिवसेना आणि भाजप युतीचे शिल्पकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -