घरमहाराष्ट्रझरीन खानच्या मागे लागले ग्रहण

झरीन खानच्या मागे लागले ग्रहण

Subscribe

औरंगाबाद येथील मोबाईल शॉपच्या उदघाटनादरम्यान अभिनेत्री झरीन खानच्या फॅन्सने एकच गर्दी केली होती. धक्का बुक्की झाल्याने ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे कार्यक्रम मध्येच थांबवण्यात आला.

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान ही मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. मागील काही दिवसांपासून झरीन खान अनेक विवादांमध्ये अडकली असल्याचे समोर आले. नुकताच झरीनच्या सेक्रेटरीने तिच्यावर पैशावरून वाद घातला तर काही दिवसांनंतर तिच्या चालकाने गोवा येथे एका दूचाकी स्वाराला धडक दिली होती. यानंतर आज औरंगाबाद येथे एका कार्यक्रमादरम्यान फॅन्सने गोंधळ घालून कार्यक्रम बंद केला. यासर्व घटनांनंतर अभिनेत्री झरीन खानच्या मागे ग्रहण लागले असल्याची चर्चा तिच्या फॅन्समध्ये आहे.

कसा घडला प्रकार

एका मोबाईल शॉपच्या उदघाटनासाठी अभिनेत्री जरीन खान औरंगाबाद येथे आली होती. शॉपच्या मालकाने पोलीस बंदोबस्त बोलवण्या ऐवजी खाजगी बाउन्सर बोलावले होते. झरीनला बघण्यासाठी लोकांनी फॅन्सने एकच गर्दी केली. बाउन्सर या गर्दीतील लोकांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. यातून उदभवलेल्या वादामुळे फॅन्स आणि बाउन्सरमध्ये हाणामारी झाली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यावर अखेर आयोजनकांना कार्यक्रम रद्द करावा लागला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -