घरमुंबईअंधेरी रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये अडकले १२ प्रवासी; २० मिनिटांनी सुखरूप सुटका

अंधेरी रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये अडकले १२ प्रवासी; २० मिनिटांनी सुखरूप सुटका

Subscribe

मुंबई – पश्चिम उपनगरातील महत्वाच्या अशा अंधेरी रेल्वे स्थानकातील लिफ्ट अचानक बंद पडल्याने १२ प्रवासी अडकून पडले होते. त्यामध्ये तीन महिला प्रवासी होते. मात्र आरपीएफ पोलीस,अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळून अथक प्रयत्नाने तब्बल २० मिनिटांनी त्यांची सुखरुप सुटका केली. त्यामुळे लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी लिफ्टच्या बाहेर आल्यावर सुटकेचा निःश्वास सोडला. सदर घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते.

ही घटना घडल्याचे समजताच रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली होती. लिफ्टच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती. तर लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांकडून मदतीसाठी मोबाईलचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू होता. मदतीसाठी लिफ्टमधून आरडाओरड सुरू होती. मात्र, रेल्वे प्रशासन व अग्निशमन दल आणि पोलीस यांनी लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका होईपर्यंत त्यांना मानसिक धीर देत त्यांची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

- Advertisement -

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ येथील लिफ्टमध्ये १२ प्रवासी गेले होते. मात्र लिफ्ट सुरू झाल्यावर लगेचच अचानकपणे बंद पडली. बराचवेळ प्रयत्न करूनही लिफ्ट न उघडल्याने लिफ्टमधील प्रवासी घाबरले होते. त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी लिफ्टमधून आरडाओरड सुरू केली. त्यानंतर रेल्वे स्थानकातील पोलीस, रेल्वेचे या
अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सदर लिफ्ट तांत्रिक कारणामुळे की जास्त लोड झाल्याने बंद पडली, याबाबतचे कारण समजू शकले नाही. मात्र पोलीस व अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून २० मिनिटांनी लिफ्टचा दरवाजा उघडला व लिफ्टमध्ये अडकलेल्या १२ प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले आणि त्या प्रवाशांच्या जीवात जीव आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -