घरताज्या घडामोडीमुंबईत KEM रुग्णालयात MBBSचे २२ विद्यार्थ्यी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईत KEM रुग्णालयात MBBSचे २२ विद्यार्थ्यी कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

सर्व विद्यार्थ्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले होते

मुंबईत कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईतील KEM रुग्णालयातील एमबीबीएसच्या (MBBS) दुसऱ्या वर्षाच्या २२ विद्यार्थ्यांना कोरोना लागण (corona positive)  झाल्याचे समोर आले आहे. सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधील (seth G.S. Medical College)  विद्यार्थी आविष्कार कार्यक्रमाच्या मिटींगसाठी एकत्रित आले होते. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र तरी देखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यासंबंधीची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी दिली. लसीचे दोन डोस घेऊन देखील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मास्क घालणे गरजेचे आहे. मागील दोन दिवसात विद्यार्थ्यांना कोरोना लागण झाली असल्याचे महापौर म्हणाल्या.

केईएम रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांना मुंबईतील सेव्हल हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे निगेटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॅव्हल सर्टिफिकेट देऊन घरी सोडण्यात येत असून अद्यापही विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे वसतीगृह सील करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्यांचा विचार केला असता गणेशोत्सवानंतर मुंबईतील रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. मुंबईत बुधवारी ५२७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली तर ६ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत सध्या ४,७२४ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – School Reopen : मुंबईत एक दिवसाआड शाळा भरणार – महापौर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -