घरमुंबईकोरोना रुग्णांसाठी २,८०४ बेड्स ; विमानतळावर परदेशी प्रवासाची तपासणी

कोरोना रुग्णांसाठी २,८०४ बेड्स ; विमानतळावर परदेशी प्रवासाची तपासणी

Subscribe

आंतरराष्ट्रीय विमानतळावर २% प्रवाशांच्या आरटी - पीसीआर चाचण्या

मुंबई -: चीन व इतर देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. मुंबईतही कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाने मुंबई महापालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. मुंबई महापालिकेने शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास उपचारासाठी विविध रूग्णालयात तब्बल २,८०४ बेड्सची व्यवस्था केली आहे. यामध्ये, सर्वसाधारण बेड, ऑक्सिजन बेड, अतिदक्षता बेड आदींचा समावेश आहे.

तसेच, मुंबई महापालिकेने, कोरोना – १९ विषाणूबद्दल जनजागृती वाढवणे आणि कोविडचा प्रसार रोखण्यासाठी योग्य/ सुसंगत वर्तनाचा वापर करणे, कोविड रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करणे, नियमित आरटी – पीसीआर चाचणीवर भर देणे, वॉर्ड वॉर रूमद्वारे जनतेशी प्रभावीपणे संवाद साधणे, लसीकरण मोहीम प्रभावीपणे पार पाडणे आदी उपाययोजनांवर जोर देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

जगभरात कोरोना -१९ ची पहिली व दुसरी लाट येऊन गेली. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढून चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि फ्रान्स या देशांमध्ये रुग्णांमध्ये वाढ होऊन कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्राने २० आणि २२ डिसेंबर २०२२ रोजी अद्ययावत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर २% प्रवाशांच्या आरटी – पीसीआर चाचण्या

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ प्राधिकरणामार्फत २% आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आरटी – पीसीआर चाचण्या करण्यात येणार आहेत. सर्व पॉझिटिव्ह नमुने जनुकीय तपासणी करिता राष्ट्रीय विषाणूविज्ञान (NIV) (पुणे) प्रयोगशाळेत पाठवले जातील. कोरोना -१९ चाचण्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

कोरोना रुग्णांसाठी विविध रुग्णालयांत २,८०४ बेड्स

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेने सेव्हन हिल्स रूग्णालयात १,७०० बेड्स, कस्तुरबात ३५ बेड्स, कामा रुग्णालयात – १०० बेड्स, सेंट जॉर्ज रुग्णालयात ७० बेड्स, टाटा रुग्णालयात – १६ बेड्स, जगजीवन राम रुग्णालय – १२ बेड्स आणि विविध २६ खासगी रुग्णालयात ८७१ बेड्स अशा एकूण २,८०४ बेड्सची व्यवस्था केली आहे. यामध्ये,ऑक्सिजन आणि आयसीयू बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. या सर्व रुग्णालयातील रुग्णांच्या भरतीचे व्यवस्थापन वॉर्ड वॉर रूमद्वारे केले जाईल.

२४ वार्डांत वॉर रूम

महापालिकेच्या २४ वार्डांमध्ये, वॉर्ड वॉर रूम २४ x ७ कार्यरत आहेत, नागरिक कोणत्याही अडचणीच्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. कोरोना -१९ रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO), ड्युरा सिलेंडर्स आणि PSA टँकच्या स्वरूपात पुरेशी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

कोरोना – १९ चा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी खालील नियम पाळणे

  1. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे

2.  इतरांपासून अंतर राखणे

3.  साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे

4. आजारी असताना घरी अलगीकरणात राहणे.

5. वृद्ध नागरिक आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

6. सर्व नागरिकांनी लसीकरण आणि प्रिकॉशनरी डोस घ्यावेत.


वादग्रस्त डान्सर गौतमी पाटीलची आता थेट चित्रपटात एन्ट्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -