घरमुंबईनिवडणुकीसाठी ४२०० गाड्यांची आवश्यकता

निवडणुकीसाठी ४२०० गाड्यांची आवश्यकता

Subscribe

- जिल्हाधिकार्‍याची परिवहन विभागाकडे मागणी

मुंबई शहरात येत्या २९ एप्रिल रोजी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज होत आहे. निवडणुकीकरिता जिल्ह्याधिकार्‍यांनी परिवहन विभागाकडे ४ हजार २०० वाहनांची मागणी केलेली आहे. त्यामध्ये २ हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा समावेश आहे. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी मुंबईकरांना टॅक्सी मिळविण्याकरिता काहीशी धावपळ करावी लागण्यची शक्यता आहे.

चौथ्या टप्यात मुंबई, ठाणे,भिंवडी,कल्याण,पालघर,नाशिक, धुळेसह काही भागात मतदान होणार आहे. मुंबईतील मतदानासाठी आरटीओ कार्यालये वाहनांची तजवीज करीत आहेत. आरटीओ पुरविणार असलेल्या गाड्यां या भाडेतत्वावर घेण्यात येतात. त्याचे भाडे निवडणुक आयोगाकडून देण्यात येते. शहर आणि उपनगर अशा दोन्ही जिल्हाधिकार्‍यांकडून निवडणुकीसाठी अतिरिक्त गाड्यांची मागणी परिवहन विभागाकडे केलेली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याधिकाजयांनी २ हजार ९८५ वाहनांची मागणी केलेली आहे. त्यामध्ये १४६६ टॅक्सी. १४३४ बसेस आणि ८४ ट्रकचा समावेश आहे. तर मुंबई शहर जिल्ह्याधिकाजयांनी ६०७ टॅक्सी, ५६३ बसेस आणि ६३ ट्रक अशा १२०६ वाहनांची मागणी केलेली आहे. या गाड्या २७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासुन निवडणुकीच्या कामासाठी कार्यरत होणार आहेत.सलग दोन दिवस या गाड्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असणार आहेत.

- Advertisement -

निवडणुकीच्या काळात गाड्या पुरविण्यासाठी परिवहन विभाग टॅक्सी ,बसेस युनियनला अपील करतात. त्यानुसार युनियन सोबत परिवहन अधिकार्‍यांच्या बैठका देखील होत आहेत. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या पुरविण्यासाठी परिवहन विभागाला मोठा धावपळ करावी लागत आहे. निवडणुकीच्या कामासाठी शहरातील अ‍ॅग्रीग्रेट टॅक्सी मात्र उत्सुक नसल्याचे दिसून येत असल्याचे परिवहन विभागातील एका अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -