घरCORONA UPDATEड्युटी बरोबर माणूसकीही महत्त्वाची, अंबरनाथमध्ये पोलिसांनी केले अन्नवाटप!

ड्युटी बरोबर माणूसकीही महत्त्वाची, अंबरनाथमध्ये पोलिसांनी केले अन्नवाटप!

Subscribe

अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामार्फत केवळ पोलीस बंदोबस्त नाही तर प्राचीन शिवमंदिरजवळील झोपडपट्टी परिसरात जाऊन अन्न वाटप करून आपले कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे .

कोरोनामुळे सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे,  पोलीस कर्मचारी अधिकारी त्यासाठी दिवसरात्र बंदोबस्त करीत आहेत,  पोलिसांकडून काही ठिकाणी लाठीमार, काही ठिकाणी लोकांना उठबशा मारायला लावणे तर काही ठिकाणी गांधीगिरी केली जाते मात्र अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजीत सिंग बग्गा हे जेवढ्या बंदोबस्तच्या बाबत शिस्तबद्ध आहेत तेवढेच माणुसकीच्या बाबत देखील परिचित आहेत . त्यांच्या पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या प्राचीन शिवमंदिरजवळ झोपडपट्टी मध्ये पोलिसांकडून अन्न वाटप करण्यात येत आहे. स्वतः बग्गा आणि पोलीस कर्मचारी हे अन्न वाटप करत आहेत. यावेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाते,  अन्न घेण्यासाठी नागरिक देखील शिस्तीचे पालन करतात.

- Advertisement -

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी महेश जाधव हे  मेगाफोनवर गाणे म्हणत लोकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन देत आहेत, “जिंदगी मौत न बन जाये यारो , मुश्किलो मे है वतन , हे गाणे  कळकळीने गाऊन विनंती करीत आहेत. ग्रीन सिटी, लोकनगरी, आनंदनगर हायवे अशा अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त दरम्यान या अनोख्या पद्धतीने हे आवाहन करण्यात येत आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -