घरमुंबईभीमा-कोरेगावचा जनक हाजी मस्तान

भीमा-कोरेगावचा जनक हाजी मस्तान

Subscribe

एकबोटेंच्या दाव्याने आंबेडकर अनुयायांमध्ये संताप

भीमा-कोरेगावच्या दंगलीनंतर कारवाई करण्यात चालढकल झालेल्या मिलिंद एकबोटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. भीमा कोरेगाव दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नव्हे तर अंडरवर्ल्ड हाजी मस्तान याने सुरू केल्याचे एकबोटे यांनी म्हटले आहे. एकबोटे यांच्या या दाव्याने आंबेडकर अनुयायांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. एकबोटे यांच्या या दाव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकबोटेंच्या या दाव्यामुळे नवा वाद उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतचे स्पष्टीकरण एकबोटे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिले आहे.

कोरेगावच्या दंगलीला एकबोटे आणि संभाजी भिडे कारणीभूतअसल्याचा आरोप झाला होता. या दोघांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले होते. यापैकी एकबोटे यांनी अटकपूर्व जामीन घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. पुढे सर्वोच्च न्यायालयातही त्यांना हार मानावी लागली. एकबोटे यांच्याविरोधात कारवाई करण्यात सरकारने चालढकल केल्याचे स्पष्ट दिसत असताना संभाजी भिडे यांच्यावर अद्याप कारवाईच होऊ शकली नाही.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर एकबोटे यांचं प्रकरण सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी भीमा-कोरेगावच्या विजयी स्तंभाच्या उभारणीचा मुद्दा उकरून काढून थेट बाबासाहेब आंबेडकर यांनाच वादात आणले आहे. एकबोटे यांच्या या दाव्याची आनंदराज आंबेडकर यांनी चिरफाड केली असून, इतिहास महिती नसलेले अशीच बकबक करत असतात, असे म्हटले आहे. बाबासाहेब भीमा कोरेगावला जाऊन शूरवीरांना वंदन करायचे. आता एक जानेवारीला या घटनेला 201 वर्षे पूर्ण होणार आहेत. यामुळे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न एकबोटेंसारख्यांकडून केला जात असल्याचा आरोप आनंदराज यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -