Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुंबई विमानतळाचा ताबा अदानीकडे; हजारो नवे जॉब्स निर्माण करण्याचे आश्वासन

मुंबई विमानतळाचा ताबा अदानीकडे; हजारो नवे जॉब्स निर्माण करण्याचे आश्वासन

यावर्षी फेब्रुवारीत अदानी समूहाने एमआयएएलमध्ये २३.५ टक्के हिस्सा १,६८५.२ कोटी रुपयांना खरेदी केला होता.

Related Story

- Advertisement -

जगभरात प्रसिद्ध असलेल्या मुंबई विमानतळाचा ताबा आता अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने (AAHL) घेतला आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या (MIAL) मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत मुंबई विमानतळाच्या देखभाल आणि हाताळणीची जबाबदारी जीव्हीके समूहाकडून अदानी समूहाकडे देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे जीव्हीके समूहाचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईत होऊ घातलेल्या विमानतळाशी असलेला संबंध संपला आहे. मुंबई विमानतळाच्या देखभाल आणि हाताळणीची जबाबदारी मिळाल्याची माहिती अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देखभाल आणि हाताळणीची जबाबदारी देण्यात आल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आम्ही मुंबईला अभिमान वाटेल असे काम करण्याचे मी वचन देतो. अदानी समूह व्यवसाय, विश्रांती आणि मनोरंजनासाठी भविष्यात विमानतळ परिसंस्था तयार करेल. आम्ही हजारो नवे जॉब्स निर्माण करू, असे गौतम अदानी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.

यावर्षी फेब्रुवारीत अदानी समूहाने एमआयएएलमध्ये २३.५ टक्के हिस्सा १,६८५.२ कोटी रुपयांना खरेदी केला होता. याआधी हा हिस्सा एसीएसए ग्लोबल लिमिटेड (ACSA) आणि बिड सर्व्हिसेस डिव्हिजन (मौरिशस) लिमिटेड (बिडवेस्ट) यांच्या नावे होता. अदानी समूहाचा जीव्हीके समूहासोबत असलेला वाद संपल्यानंतर ते मुंबई विमानतळातील ७४ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचे म्हटले जात आहे.
- Advertisement -