घरमुंबईबुलेट ट्रेनच्या ६ मार्गांसाठी सल्लागार नेमणूक होणार

बुलेट ट्रेनच्या ६ मार्गांसाठी सल्लागार नेमणूक होणार

Subscribe

महाराष्ट्रातील दोन मार्गांचा समावेश

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा महाराष्ट्रातील प्रकल्प नव्या सरकार स्थापनेमुळे वादात आला आहे खरा. पण दरम्यानच्या काळात बुलेट ट्रेनच्या सहा हायस्पीडट्रेन कॉरिडॉरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) डीपीआरसाठीची जबाबदारी आता नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडवर (एनएचएसआरसीएल) वर टाकण्यात आली आहे. या सहा हायस्पिड रेल कॉरिडॉरपैकी दोन कॉरिडॉर हे महाराष्ट्रातील आहेत. नवीन हायस्पीड नेटवर्कचे उद्दिष्ट हे चार महत्वाच्या शहरांना जोडणे तसेच आर्थिक केंद्रांना जोडणे हे असणार आहे. लवकरच या सगळ्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया होणार आहे. सहा हायस्पीड कॉरिडॉरच्या प्रकल्पासाठी येणारा खर्च, प्रकल्पाची आवश्यकता, या मार्गावर प्रवाशांचा अंदाज तसेच प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन यासारख्या गोष्टींसाठी सल्लागार नेमणूक होणार आहे. एकदा हा डीपीआर तयार झाला की तो रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील या प्रकल्पाला आवश्यक आहे. सध्या विविध यंत्रणांच्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधा नेटवर्कमध्ये या कॉरिडॉरचे इंटिग्रेशन कसे असेल यावरही यानिमित्ताने विचार होणार आहे.

एनएसएसआरसीएलला या संपूर्ण डीपीआरसाठी सल्लागार नेमण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. तसेच डीपीआरचा खर्चही मांडण्यासाठी सांगण्यात आले आहे. पण अद्याप हा सल्लागार नेमण्यासाठी मात्र कोणताही निधी मंजूर करण्यात आलेला नाही.मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरसाठी महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा या प्रकल्पातील वाटा ५ हजार कोटी रूपयांचा आहे. तर रेल्वे बोर्डाकडून या प्रकल्पासाठी १० हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर जपानच्या जायकामार्फत ८१ टक्के इतका वाटा या प्रकल्पासाठी असणार आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाअंतर्गत आवश्यक असणार्‍या १३८० हेक्टर जागेपैकी ७०५ हेक्टर इतके भूसंपादन करण्यात आले आहे. गुजरातच्या ९४० हेक्टरपैकी ६१७ हेक्टर भूसंपादन झाले आहे. महाराष्ट्रातील ४३१ हेक्टरपैकी ८१ हेक्टर इतके भूसंपादन झाले आहे.

- Advertisement -

हे आहेत प्रस्तावित मार्ग

*मुंबई नाशिक नागपुर ७५३ किलोमीटर
*मुंबई ते हैद्राबाद व्हाया पुणे ७११ किलोमीटर
*दिली नॉयडा आग्रा कानपूर लखनऊ वाराणसी ८६५ किलोमीटर
*दिल्ली जयपूर- उदयपूर- अहमदाबाद ८८६ किलोमीटर
*चेन्नई- बंगळुरू- म्हैसूर ४३५ किलोमीटर
*दिल्ली- चंदीगढ- लुधीयाना- जालंदर- अमृतसर ४५९ किलोमीटर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -