घरमुंबई'त्या' मंत्र्यांना मंत्री पदावरून वगळलेच का? अजित पवारांनी विचारले कारण

‘त्या’ मंत्र्यांना मंत्री पदावरून वगळलेच का? अजित पवारांनी विचारले कारण

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ६ मत्र्यांना घरचा रस्ता का दाखविण्यात आला? असा सवाल फडणवीस सरकारला केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी फडणवीस सरकारने १३ नवीन मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ देऊन सरकारमध्ये सामील केले. पण त्याचवेळी जुन्या ६ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला. या ६ मंत्र्यांना का वगळण्यात आले? त्याचे कारण काय? हे सभागृहाला कळू दे. या मंत्र्यांनी कामे केली नाहीत का? की भ्रष्टाचार केला? की पक्षाला हवे तसे काम केले नाही? मंत्र्यांना वगळण्याचे नेमके कारण सांगा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.

दरम्यान राज्यात आज प्रचंड दुष्काळ आहे. चारा छावण्या सुरुच ठेवायला हव्या. हिरवा चारा उपलब्ध होत नाही तोपर्यंत छावण्या सुरू ठेवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मानवंदना वाहिली. मात्र महाराष्ट्रातील शहीदांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न तसेच आहेत, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहेत. हे आपल्या देशाला शोभणारे नाही. हा विचार कुठे तरी थांबवला पाहिजे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

नव्या मंत्र्यांनी तीन तेरा वाजवू नयेत

अंतरीम अर्थसंकल्पावेळी राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर यावेळी अजित पवार बोलत होते. “मुख्यमंत्र्यांनी १३ मंत्र्यांची ओळख सभागृहाला करुन दिली. त्याप्रमाणे ६ मंत्र्यांना का काढले? याबद्दलही सभागृहाला सांगावे, अशी मागणी पवार यांनी केली. तसेच नवीन १३ मंत्र्यांना १३ आठवडे देखील काम करता येणार नाही. कारण अधिवेशन संपल्यानंतर काही दिवसातच आचारसहिंता लागणार आहे. त्यामुळे नव्या मंत्र्यांनी या तेरा आठवड्यात कोणाचेही तीन तेरा वाजवू नये, एवढीच अपेक्षा आहे,” असा टोमणा अजित पवार यांनी मारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -