घरमुंबईगरजू लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी डोंबिवलीतील सर्व रोटरी क्लब एकत्रित प्रयत्न...

गरजू लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी डोंबिवलीतील सर्व रोटरी क्लब एकत्रित प्रयत्न करणार

Subscribe

रोटरी क्लबच्या वतीने गरीब कुटुंबातील बालकांच्या हृदयदोषावरील मोफत शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमा अंतर्गत तीन वर्षांत एकूण १७२ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न झाल्या आहेत आणि या वर्षात २०० शस्त्रक्रिया करण्याचा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चा संकल्प आहे, असे डॉ. श्रीनिवासन यांनी सांगितले.

रोटरी क्लबच्या वतीने गरीब कुटुंबातील बालकांच्या हृदयदोषावरील मोफत शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमा अंतर्गत तीन वर्षांत एकूण १७२ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न झाल्या आहेत आणि या वर्षात २०० शस्त्रक्रिया करण्याचा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चा संकल्प आहे, असे डॉ. श्रीनिवासन यांनी सांगितले. त्यामुळे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ सलग तिसऱ्या वर्षी ज्यूपीटर फाउंडेशन, जेनेसीस फाउंडेशन, हँव अ हार्ट फाउंडेशन, अनफोल्ड फाउंडेशन यांच्या सहयोगाने ज्यूपीटर हाँस्पिटलमध्ये तेथील काही सेवाभावी कार्डिअँक सर्जनच्या सहकार्याने गरीब कुटुंबातील बालकांच्या हृदयदोषावरील मोफत शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम करत आहे. या उपक्रमा अंतर्गत जरी शस्त्रक्रियेचा खर्च दिड ते साडेतीन लाख असला तरी कोणताही रोटरी सदस्य किंवा सामान्य नागरिक असे एक कार्डिअँक आँपरेशन ३० हजार रुपयांची देणगी देऊन पुरस्कृत करु शकतो, असे डॉ. श्रीनिवासन यांनी सांगितले.

रोटरी क्लबची बैठकची पार पडली

रोटरी क्लब डोंबिवली वेस्टतर्फे सदर उपक्रमाची माहिती डोंबिवलीतील सर्व रोटरी क्लबचे सदस्य, पदाधिकारी, तसेच सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींना करुन देण्याच्या उद्देशाने नुकतीच बैठक पार पडली. डॉ. श्रीनिवासन यांनी लहान मुलांच्या हृदय दोष निवारणाच्या शस्त्रक्रिया कशा होतात त्यांचे व्हिडिओ दाखवून आणि माहिती सांगून उपस्थितांना या उपक्रमाबद्दल अवगत केले. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रकाश शहा, असिस्टंट गव्हर्नर अभय कोठारे आणि प्रशांत आंबेकर तसेच लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया उपक्रमाचे अँव्हेन्यू को चेअर समिर शिंदे आणि सल्लागार हर्षद ठक्कर उपस्थित होते. तसेच डोंबिवलीतील रोटरी क्लब मिडटाउनचे अध्यक्ष संजय पाटील, डोंबिवली सनसिटी क्लबचे अध्यक्ष ओंमकार दाहोत्रे, डोंबिवली नाँर्थ क्लबचे अध्यक्ष अमित श्रीवास्तव , डोंबिवली क्राऊन सिटी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल गायकर आणि इंडस्ट्रीयल क्लबचे प्रकाश सिनकर उपस्थित होते. या सर्वांनी एकत्रितपणे या उपक्रमाला डोंबिवलीतील सर्व रोटरी परीवारातून जास्तीत जास्त दाते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. डोंबिवलीतील सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींना या उपक्रमाची माहिती देऊन गरजू बाल रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी विनंती करण्याचे पण ठरवले आहे. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी रोटरी क्लब आँफ डोंबिवली वेस्टच्या अध्यक्षा दिपाली पाठक यांच्याशी ७०४५०५६०६० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -