Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई अमित ठाकरेंना विद्यार्थी सेनेची जबाबदारी द्या; मनसे कार्यकर्त्यांची मागणी

अमित ठाकरेंना विद्यार्थी सेनेची जबाबदारी द्या; मनसे कार्यकर्त्यांची मागणी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेने आता पक्षाच्या विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विराजमान होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान, आदित्य शिरोडकर यांनी शिवबंधन हाती बांधल्यानंतर मनसेने नवीन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमित ठाकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जावी, अशी मागणी मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

अशी आहे कार्यकर्त्यांच्या मागणी

मनसे नेते अमित ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष पद देण्यात यावे, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मात्र, या मागणीसंदर्भात राज ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसेने नवीन मनविसे अध्यक्ष पदासाठी राज ठाकरेंनी पक्ष श्रेष्ठींना पक्षातील युवक नेत्यांची यादीही मागवली आहे. ज्यांचा विचार मनविसे अध्यक्ष पदासाठी करण्यात येणार आहे. मात्र, हा निर्णय लवकर होणार की नाही? याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

- Advertisement -

आदित्य शिरोडकर यांनी शुक्रवार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. शिरोडकर यांनी मनसे राजीनामा दिल्याने आता मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद अमित ठाकरे यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित ठाकरे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे तातडीने नाशिकला दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये राज ठाकरे यांची भेट घेऊन हे दोन्ही नेते विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय.


पवार-मोदी भेटीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा; राष्ट्रवादीने दिलं स्पष्टीकरण
- Advertisement -