घरमुंबईअतिक्रमण विभागाचा भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर,नगरविकास विभागाचा दणका

अतिक्रमण विभागाचा भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर,नगरविकास विभागाचा दणका

Subscribe

नवी मुंबई:- एमआरटीपी अ‍ॅक्टच्या नोटीसचा गैरवापर करून लाखोंचा भ्रष्टाचार होत आहे.अतिक्रमण विभागातील अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटनीगिरे व त्यांच्या सहकारी अधिकार्‍यांनी भ्रष्टाचाराचे रॅकेट तात्काळ थांबवावे. तसेच या विषयाचा सविस्तर अहवाल राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला द्यावा, असे आदेश नगरविकास विभागाकडून मनपा आयुक्त यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मनपातील अतिक्रमण विभाग पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.

एखादा अधिकारी, एखाद्या घोटाळ्यात सहभागी असेल तर त्याची विशेष पदावर नियुक्ती करण्यात येऊ नसे ,असा शासनाचा नियम आहे. तरीही मनपा आयुक्त रामास्वामी यांनी अमरीश पटनीगिरे यांना अतिक्रमण उपायुक्त या पदावर कायम ठेवले. पटनीगिरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

नवी मुंबई मनपातील अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटनीगिरे यांच्या आदेशाने अतिक्रमण अधिकारी आणि जी -विभाग कार्यालयात कार्यरत असणारे विभाग अधिकारी बी.एस.जाधव, अतिक्रमण अधिकारी निलेश मोरे हे अनेक रहिवाशांंना घाबरवतात. हायकोर्ट, शासन यांच्या नावाने खोटे दस्तावेज दाखवून त्यांच्या घरांवरती अतिक्रमण कारवाई करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करतात, असा आरोप वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

ऐरोली परिसरात या भ्रष्ट अधिकार्‍यांच्या जाचाला जनता कंटाळली असून हे अधिकारी पोलीस बंदोबस्तात आपले रॅकेट चालवत आहेत. त्यामुळे लवकरच यावर कठोर पावले उचलण्यात यावीत अशी मागणीही वाघमारे यांनी केली आहे. या अधिकार्‍यांना एखाद्याने जाब विचारला असता आम्हाला महाराष्ट्र शासनाने या पदावर बसवले आहे.त्यामुळे या पदाचा आम्ही कसाही वापर करू शकतो असे सांगून सदरील अधिकारी हे शासनाची बदनामी करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांच्या नावाने व त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने कुठे कुठे जंगम मालमत्ता ,गाड्या, बंगले, खात्यातील रक्कम आहे, याची सर्व चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.

- Advertisement -

ऐरोली विभागात कार्यरत असणारे शाखा अभियंता निलेश मोरे हे सहा वर्षांपूर्वी कोपरखैरणे विभागात ६ हजार पगारावर काम करत होते. आता त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. ही संपत्ती नेमकी आली कुठून? याची चौकशी व्यायला हवी. शेकडो अतिक्रमणधारकांना एमआरटीपी अ‍ॅक्टच्या नावाखाली नोटीसा देण्यात आल्या असून कारवाईच्या नावाखाली आतापर्यंत लाखो रुपये उकळण्यात आले आहेत.याप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून लवकरच मोठा घोटाळा समोर येईल.

महेश वाघमारे :- सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -