शाहरुखला भेटण्यासाठी आर्यनला घ्यावी लागते अपॉईंटमेंट

क्रुझ रेव्ह पार्टीप्रकरणी एनसीबीच्या कचाट्यात सापडलेल्या आर्यन खानने वडीलांना म्हणजेच शाहरुख खान यांना भेटण्यासाठीही आपल्याला अपॉईंटमेंट घ्यावी लागत असल्याचं चौकशीत सांगितलं आहे.

सध्या क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनसह अकराजणांना अटक करण्यात आली आहे. यात आर्यनसह आठजणांना न्यायालयाने ७ तारखेपर्यंत एनसीबीची कोठडी दिली आहे. यादरम्यान, एनसीबीचे अधिकारी सर्व आरोपींची कसून चौकशी करत आहेत. यावेळी अधिकाऱ्यांनी आर्यनला त्याचे आईवडिलांशी असलेल्या संबंधाबद्दल विचारले . त्यावेळी वडील कामात प्रचंड बिझी असतात यामुळे त्यांच्याशी बोलायला किंवा भेटायलाही त्यांची सेक्रेटरी पूजा हीच्याकडून मला अपॉईंटमेंट घ्यावी लागते असा खुलासा आर्यनने केला. शाहरुख सध्या पठाण या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. त्यासाठी त्याला तासन् तास मेकअपमध्ये राहावं लागतय. पण याचदरम्यान, आर्यनला अटक झाल्याने शाहरुख शूटींग अर्धवट सोडून मुंबईला परतला आहे.