घरपालघरअखेर! जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शाळेची घंटा वाजली

अखेर! जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शाळेची घंटा वाजली

Subscribe

सोमवारपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पालघर जिल्ह्यातील शहरी भागातील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीचे वर्ग तर ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० पासून देशात लॉकडाऊन लागू केल्याने सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता दीड वर्षानंतर कोरोनाचा प्रसार मंदावला आहे आणि बहुतेकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याने सोमवारपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पालघर जिल्ह्यातील शहरी भागातील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीचे वर्ग तर ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. दीड वर्षांपासून घरात बसून असलेल्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हर्षोउल्हास दिसून आला. त्याच आनंदाच्या भरात मुलांनी अगदी टापटीप शाळेचा गणवेश परिधान करून शाळेकडे धाव घेतल्याचे चित्र दिसून आले. यावेळी शिक्षकांनीही विधर्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना शालोपयोगी पुस्तक, वह्या व मास्कचे वाटप केले आले.

सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी तोंडावर मास्क लावले होते. वर्गाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची सोय केलेली होती. विद्यार्थ्यांची ऑक्सिमिटरने तपासणी केली करून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी प्रत्येक बाकावर एका विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली होती. वाडा तालुक्यात जिल्हा परिषद व खासगी अशा एकूण ३५७ शाळा असून त्यापैकी आज ३१ शाळा सुरु झाल्या. तर १११ शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने काही शाळांना सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या बंद आहेत. सुरु झालेल्या शाळेतील एकूण ४४२३ विध्यार्थी उपस्थित होते. तालुक्यातील एकूण २५० शिक्षकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली असून हजर विध्यार्थ्यांच्या पालकांनी संमती पत्रही दिले आहेत. वाडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुका होत असल्याने तालुक्यातील बहुतेक शाळेतील शिक्षकांची मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारपासून शाळा नियमित सुरू होतील, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाराठे यांनी दिली.

- Advertisement -

आनंदी वातावरणात शाळेचा पहिला दिवस

महाराष्ट्र शासनाने पाचवीच्या पुढील शाळा सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेज त्याचबरोबर जव्हारमधील के. व्ही. हायस्कूल या दोन्ही नामवंत शाळा सुरू करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती पन्नास टक्के होती. शाळा दीड वर्षानंतर उघडल्यामुळे विद्यार्थीवर्ग आनंदीत होता. भारती विद्यापीठ प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. जे. कनुंजे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले. तर के. व्ही. हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत चॉकलेट देऊन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा जवळजवळ दीड वर्ष बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे शाळेतून कोरोनाचा कोणताही धोका उद्भवू नये, यासाठी कोरोना नियमाचे आम्ही काटेकोर पद्धतीने पालन करू, अशी माहिती मुख्याध्यापक महाले यांनी दिली. सोमवारपासून ग्रामीण भागात ५ ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू केले करण्यात आले आहेत. एका वर्गात पन्नास विद्यार्थी असतील. आलटून-पालटून पंचवीस विद्यार्थ्यांनाच वर्गात बसवण्यात येणार. प्रत्येक बाकावर एकच विद्यार्थीच बसेल. विद्यार्थ्यांना वेळोवेळी कोरोनाबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जातील. ८ ते १२ वी पर्यंतचे सर्व वर्ग सकाळी ८ ते १२ पर्यंत सुरू राहतील. ५ ते ७ पर्यंतचे वर्ग १२-३० ते ४ वाजेपर्यंत सुरु राहतील, अशी माहितीही महाले यांनी दिली.

- Advertisement -

भाईंदरमधील महापालिकेची शाळा भरली

मीरा भाईंदर महापालिकेच्या शाळेच्या आठवी इयत्तेची घंटा अखेर दीड वर्षांनी वाजली. पहिल्या दिवशी १७४ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, गुलाबाची फुले, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. महापालिकेच्या एकूण ३६ शाळा असून त्यापैकी इयत्ता ८ वीचे वर्ग असणाऱ्या आठ शाळा आहेत. त्या सर्व शाळा सोमवारपासून सुरू करण्यात आल्या. आठवी इयत्तेत एकूण ४२४ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १७४ विध्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. शाळा सुरु करण्यापूर्वी सोडीयम हायक्लाईडस फवारणी, परिसर स्वच्छता यासह सर्व प्रकारच्या खबरदाऱ्या घेण्यात आल्या असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कविता बोरकर यांनी दिली. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन पद्धतीने मुलांचे शिक्षण सुरू होते. मात्र महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन व घरात इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अभ्यासाचे मोठे नुकसान होत होते. शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सर्व विध्यार्थ्याचे पुष्पगुच्छ, गुलाबाची फुले, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. सुरवातीच्या काळात आनंदीमय वातावरण तयार करण्यावर शाळा व्यवस्थपानाचा भर असणार आहे. शाळा सुरू झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसून आला. कोरोनापासून वाचण्यासाठी व मुलांच्या सुरक्षतेसाठी शाळेत तापमान चेक करण्याची व्यवस्था, सॅनिटायझर याचबरोबर विध्यार्थ्याच्या बैठकीकडे देखील लक्ष देण्यात आले आहे.

हेही वाचा –

टीका झाली तरी चालेल, पण लोकांना खोटा धीर देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -