Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईला कमजोर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप

मुंबईला कमजोर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप

Subscribe

संजय राऊत हे बेळगावहून पुन्हा मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि मुंबईच्या मुद्द्यावरून भाजपवर ताशेरे ओढले.

कर्नाटकात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी भाजप, काँग्रेससहित ठाकरे गटाचे नेते देखील बेळगावात जाऊ लागले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील बेळगावातील महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावला हजेरी लावली होती. त्यानंतर आज ते पुन्हा मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि मुंबईच्या मुद्द्यावरून भाजपवर ताशेरे ओढले.

मुंबईवर सातत्याने हल्ले करण्याचा प्रयत्न कशासाठी?
मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव होता. मुंबईसाठी हुतात्म्यांचे बलिदान आहे. मुंबईवर सातत्याने हल्ले करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, ते कशासाठी? मुंबईला कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इथले प्रकल्प पळवून नेले जात आहेत. मराठी माणसाचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मुंबई महाराष्ट्रात राहू नये यासाठी वारंवार प्रयत्न सुरु आहेत. वसंतदादांपासून मुंबईच्या रक्षणासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू म्हटले आहे. त्याचा विसर पडू दिला नाही. आम्ही मुंबईला धक्का लागू देणार नाही, मुंबई ही भांडवलदारांची बटीक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे म्हणत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

शरद पवारांच्या पुस्तकाबाबत उद्धव ठाकरे लवकरच बोलणार…
शरद पवार (Sharad pawar) यांनी “माझे सांगाती… राजकीय आत्मकथा” या त्यांच्या पुस्तकात अनेक राजकीय घडामोडींचा उलगडा केलेला आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे हे फक्त दोनदा मंत्रालयात गेले, असा उलगडा केलेला आहे, पण उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात होते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तर लवकरच उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या पुस्तकाबाबत बोलण्यासाठी मुलाखत देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तर शरद पवार हे जाणकार आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील. महाविकास आघाडीला त्यांचे मार्गदर्शन कायम असेल. शरद पवारांसारखे लोक राजकारणातून कधी निवृत्त होत नाहीत, असे मत सुद्धा राऊतांनी यावेळी व्यक्त केले.


हेही वाचा – “राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांनी अध्यक्ष पद भूषवावे”, जयंत पाटालांची इच्छा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -