घर मुंबई महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली करण्याच्या मनोवृत्तीची...; जयंत पाटील यांची महत्त्वाची टिप्पणी

महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली करण्याच्या मनोवृत्तीची…; जयंत पाटील यांची महत्त्वाची टिप्पणी

Subscribe

मुंबई : अकोल्यानंतर शेवगाव आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार राडा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये जातीयवादी दंगली करण्याच्या मनोवृत्तीची कोणी आहे असे मला वाटत नाही.

जयंत पाटील म्हणाले की, चिघळलेले वातावरण महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या ठिकाणी दंगली सदृश्य वातावरण निर्माण व्हायला लागले आहेत. हे कोणामुळे होत आहेत? जाणिपूर्वक तयार होत आहे का? आणि दोन दिवसात घडलेल्या घटनांची सरकारने विशेषत: गृहविभागाने ताबडतोब दखल घेऊन योग्य पाऊले उचलली पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली करण्याच्या मनोवृत्तीची कोणी आहे, असे मला वाटत नाही. त्यामुळे जातीय दंगली तत्कालीन कारणाने, गैरसमजातून होत असतील आणि कोणी जाणिवपूर्वक करत असेल तर त्याचा तपशीलवार पोलिसांनी शोध लावला पाहिजे आणि अशा दंगली घडणार नाही याची सरकारने काळजी घेतली पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रातील दंगली सदृश्य परिस्थिती घडवण्यामध्ये कोणाचा फायदा होतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कट करणारे कुठल्या बाजूचे आहेत, त्यांचा कट काय आहे आणि कट असेल तर राज्याच्या गृहखात्याने ते शोधून काढले पाहिजे. महाराष्ट्रातील अकोल, शेगाव आणि त्र्यंबकेश्वर मध्ये वेगवेगळ्या दंगलीसारखी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दगडफेक झाली. यासाठी सरकारने एसआयटी नियुक्ती केली आहे. सरकारने या दंगली का झाल्या, कोण या दंगलीच्या पाठी आहे, कोणचा हात यामध्ये आहे, कोणाला या दंगलीनंतर फायदा होणार आहे. या सर्व गोष्टींचा एसआयटीने तपास केला पाहिजे. एसआयटीने शोधून काढले पाहिजे की, कोणती शक्ती या दंगलीच्या पाठीमागे आहे, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यामुळे त्यांना दंगलीबद्दल जास्त माहिती आहे. त्यांना वाटत असेल की कोणी कट केला आहे, तर त्यांनी ते शोधून काढले पाहिजे. त्यांना वाटत असेल कट आहे, तर त्या कटाच्या मागे कोणाचा हात आहे, याचा लवकरात लवकर एसआयटीच्या माध्यमातून तपास करून शोधून काढणे आणि लोकांसमोर हजर करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -