Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona: मुंबईतील 'हे' आहेत कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट

Corona: मुंबईतील ‘हे’ आहेत कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट

गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व- पश्चिम आणि चेंबूर, असे काही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरु लागले आहेत.

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग मुंबईत झपाट्याने होताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खालच्या दिशेने गेलेला आलेख पुन्हा एकदा वर जाताना दिसत आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर आता १.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्याम, गेल्यावर्षी कोरोनाचे सर्वात अधिक रुग्ण हे वरळी आणि धारावी परिसरात आढळून येत होते. मात्र, गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व- पश्चिम आणि चेंबूर, असे काही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरु लागले आहेत. तर पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्यचा सर्वाधिक असल्यचे दिसून येत आहे.

मुंबईकरांची चिंता वाढली

मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. दररोज राज्यात ४० हजारच्यावर रुग्ण आढळून येत असून यातील ७ ते ८ हजार रुग्ण हे केवळ मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात चेंबूर, गोवंडी आणि वांद्रे या भागात कोरोनाचे रुग्ण सर्वात अधिक प्रमाणात आढळून येत होते. त्यानंतर आता पश्चिम उपनगरातील काही परिसर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत ९ हजार ९० कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे आता मुंबईकरांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.

रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवसांवर

- Advertisement -

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ४४ दिवसांवर गेला आहे. तर गोरगावमध्ये हेच प्रमाण ३३ दिवसांवर गेले आहे. तर वांद्रे पश्चिम येथे हा कालावधी ३४ दिवसांवर गेला आहे. तर अंधेरी पूर्व – जोगेश्वरी येथे ३७ दिवसांमध्ये, चेंबूर-गोवंडी विभागात ३७ दिवस आणि अंधेरी पश्चिम येथे ३८ दिवसांमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण

- Advertisement -