घरमुंबईगर्दीला कारणीभूत मॉल, डी मार्टवर कारवाई करावी, भाई जगताप यांची पालिका आयुक्तांकडे...

गर्दीला कारणीभूत मॉल, डी मार्टवर कारवाई करावी, भाई जगताप यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

Subscribe

नदी, नाला रुंदीकरणाअंतर्गत बाधितांचे पुनर्वसन

पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरप्रमाणेच अपघातग्रस्तांना त्वरित उपचार देण्यासाठी पूर्व उपनगरातील गोवंडी, चांदिवली, कांजूरमार्ग येथेही लवकरच ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे. याप्रसंगी, कॉंग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवि राजा, भूषण पाटील व संदेश कोंडविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील डंपिंग ग्राउंड, ट्रॉमा केअर सेंटर, पोयसर नदी आणि गोरेगाव येथील नाला रुंदीकरणाअंतर्गत बाधितांचे पुनर्वसन करणे, ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर संपुर्णपणे माफ करणे आदी विषयांबाबत भाई जगताप व त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पालिका आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेऊन एक लेखी निवेदन दिले.

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ उपचार मिळाल्यास तो बरा होण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरचा अपघात ग्रस्तांना व गंभीर आजारी व्यक्तींना मोठा आधार मिळत आहे. त्याचप्रमाणें, पूर्व उपनगरातील जनतेलाही अपघात, आजारपणात तात्काळ चांगले उपचार मिळावेत व त्याचे प्राण वाचावेत यासाठी पूर्व उपनगरात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी भाई जगताप यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर पालिका आयुक्त यांनी सकारात्मकता दर्शवत पूर्व उपनगरातील गोवंडी, चांदिवलीतील संघर्ष नगर व कांजूरमार्ग येथे येत्या ऑक्टोबर महिन्यापासून ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्त यांनी दिल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीला कारणीभूत असलेल्या डी मार्ट, मॉल्स आदी ठिकाणी कडक कारवाई करावी, अशी मागणीही भाई जगताप यांनी, पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

नदी, नाला रुंदीकरणाअंतर्गत बाधितांचे पुनर्वसन

गोरेगांव(प.) येथील शास्त्रीनगरमधील नाला रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या  भगतसिंग नगर क्रं.२ आणि परिसरातील एकूण ६३० झोपडीवासीयांचे पुनर्वसन मालाड (पू.) , आप्पा पाडा येथील रिक्त पी.ए.पी.मध्ये करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहतो. तसेच, जोपर्यंत त्यांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येणार नाही, असे आश्वासन पालिका आयुक्त चहल यांनी दिल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, कांदिवली ( प.) येथील पोयसर नदीच्या रुंदीकरणाअंतर्गत बाधित होणाऱ्या ३३५ झोपड्यांचे पुनर्वसन माहुल येथे न करता त्यांना त्यांच्या राहत्या घरापासून ३ किलो मिटर परिसरात करण्यात यावे. तोपर्यंत त्यांच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येऊ नये,अशी मागणीही भाई जगताप यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -