घरमनोरंजनज्युनिअर 'मोगॅम्बो'ची Bollywood मध्ये झाली एंट्री !

ज्युनिअर ‘मोगॅम्बो’ची Bollywood मध्ये झाली एंट्री !

Subscribe

'माझा हा नवीन चित्रपट मी माझे आजोबा अमरिश पुरी यांना समर्पित करतो.' असं वर्धन पुरी सांगतो.

‘मोगॅम्बो खुश हुआ’ या वाक्यातून आजही दिवंगत अभिनेते अमरिश पुरी आपल्यामध्ये जिवंत आहेत. अमरिश पुरी यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवण्यासाठी आता त्यांचा नातू सज्ज झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार अमरिश पुरी यांचा नातू वर्धन पुरी याची लवकरच बॉलीवूडमध्ये एंट्री होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यापाठोपाठ आता वर्धन पुरी देखील चित्रपट सृष्टीत आपलं पहिलं पाऊल टाकत आहे. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार वर्धन पुरी लवकरच रोमँटिक लव्हस्टोरी असलेल्या एका चित्रपटात झळकणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक जयंतीलाल गडा हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. वर्धन पुरी याने याआधी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांमधून कामं केली आहेत. इतकंच नाही तर ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘दावत ए इश्क’ या दोन बॉलीवूडपटांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्याने काम केले आहे.

vardhan puri instagram
वर्धन पुरी (सौजन्य-इन्स्टाग्राम)
हेही वाचा : किंग खान शाहरुखची ‘धूम-४’ मध्ये एंट्री होणार?

वर्धन त्याचे आजोबा अमरिश पुरी यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणतो, ‘मी नेहमीच त्यांना देवासमान मानतो. अभिनयामध्ये ते माझं प्रेरणास्थान आहे. माझं आणि त्याचं नात खूप जवळचं होतं. ज्यावेळी त्यांचं निधन झालं त्यावेळी मला माझं छत्र आणि सुरक्षा कवच गेल्यासारखं वाटलं.’ ‘यापुढे मी जे काही करेन ते सर्व माझ्या आजोबांना समर्पित असेल. माझा नवीन चित्रपटही मी त्यांनाच समर्पित करतो.’ असंही वर्धन सांगतो.

दरम्यान आजवर अनेक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांच्या ‘स्टार किड्स’नी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यापैकी काहीजण बॉलीवूडमध्ये टिकून राहिले तर काही जणांना इथे यश मिळवता आले नाही. त्यामुळे एवढ्या दिग्गज अभिनेत्याचा नातू असलेल्या वर्धनकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. आता प्रेक्षकांच्या अपेक्षांवर वर्धन पुरी खरा उतरणार का? हे येणारी वेळच सांगेल.
पाहा : Video ‘गोल्ड’ सिनेमातील नवं धमाल गाणं
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -