घरमुंबईकर्करोगग्रस्त मुलांनी काळाचौकीच्या महागणपतीचं घेतलं दर्शन

कर्करोगग्रस्त मुलांनी काळाचौकीच्या महागणपतीचं घेतलं दर्शन

Subscribe

कर्करोगग्रस्त मुलांना आपल्या दु:खाला विसरता यावं यासाठी काळाचौकी सार्वजनिक उत्सव मंडळ येथे आज मुलांना बाप्पाचे दर्शन घडवले आहे.

कर्करोगग्रस्त मुलांना आपल्या दु:खाला विसरता यावं यासाठी काळाचौकी सार्वजनिक उत्सव मंडळ आणि सीपीएए म्हणजे कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांच्या सहकाऱ्याने या मुलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मुलांनी सोमवारी आपल्या कर्करोगाच्या उपचारांना थोडं बाजूला ठेऊन काळाचौकी महागणपतीचं दर्शन घेतलं. महागणपतीसाठी केलेल्या देखाव्याला आणि बाप्पाला याची डोळा, याची देह पाहण्यासाठी या मुलांचा उत्साह दांडगा होता. या मुलांनी इथे येणाऱ्या भक्तांसाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी गाण्यांची ही मेजवानी सादर केली. इथे आलेल्या भाविकांनी ही त्यांचं मनभरुन कौतुक करत त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी या मुलांसोबत त्यांच्या माताही उपस्थित होत्या.

अनेक वर्षे सायन हॉस्पिटलमध्ये ही मुलं कर्करोगावर उपचार घेत आहेत. या मुलांना दररोज उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. अनेकदा आपलं दैनंदिन जीवन सोडून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावं लागतं. त्यामुळे, त्यांच्या आजाराचा थोडा विसर पडावा यासाठी हा कार्यक्रम राबवला असल्याचं मंडळाचे प्रमुख कार्यवाह अमन दळवी यांनी सांगितलं. महागणपीसाठी यंदा पंढरपूराचा देखावा करण्यात आला आहे. ज्या मुलांना त्यांच्या वैयक्तिक कारणावरुन पंढरपूरात जाता येत नाही, अशा भाविकांसाठी ही एक सुवर्ण संधी असल्याचं इथे येणारे भाविक सांगतात.

- Advertisement -

हेही वाचा – काळाचौकीच्या महागणपतीसाठी विठ्ठलमंदिराचा देखावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -