घरताज्या घडामोडीBMC budget 2022 : पालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे 'फक्त गुलाबी स्वप्नं आणि घोषणा'...

BMC budget 2022 : पालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे ‘फक्त गुलाबी स्वप्नं आणि घोषणा’ – प्रभाकर शिंदे

Subscribe

मुंबई महापालिकेचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज म्हणजे 3 फेब्रुवारीला सादर करण्यात येत आहे. पालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेय. या अर्थसंकल्पावर गटनेत्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुंबई महापालिकेचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज म्हणजे 3 फेब्रुवारीला सादर करण्यात येत आहे. पालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेय. या अर्थसंकल्पावर गटनेत्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आयुक्त यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे, त्यात अंतर्गत निधीतून 27% आणि राखीव निधीतून 47% निधी उपलब्ध करण्याचे सूतोवाच केले आहे. मात्र तो महसूल जो पर्यंत पूर्णपणे उभा राहत नाही, तोपर्यंत अर्थसंकल्प पूर्ण होणार नाही. आयुक्त निधीची उपलब्धता कुठून करणार हे स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे हा अर्थशंकल्प दिवाळखोरीतील अर्थशंकल्प आहे. केवळ गुलाबी स्वप्ने व घोषणा आहेत”, अशी टीका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. उर्दू भवन बांधणार आहेत पण मग मराठी भाषा भवन आणि डबेवाला भवन याचा उल्लेख का नाही केला. असा सवालही प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तर काही गटनेत्यांनी या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

- Advertisement -

अर्थसंकल्पात नवीन काही नाही, फक्त स्वप्न – रवी राजा

यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने फक्त मुंबईकरांना स्वप्नं दाखवले आहे. त्यात नवीन काहीच नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या हिताचा वाटत नाही, अशी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सत्ताधारी शिवेसेनेला महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून घरचा आहेर दिलेला आहे. पालिकेने उत्पन्न वाढीसाठी कचरा निर्माण करणाऱ्याकडून शुल्क आकारणी करणे योग्य वाटत नाही. कोस्टल रोडच्या कामांना इतकी प्राथमिकता का दिली आहे , असा सवाल रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. तसेच, रस्त्यांना, आरोग्य, शिक्षण यांचा बजेट कमी दिलेला आहे.

मुंबईकरांसाठी चांगला अर्थसंकल्प – यंशवंत जाधव

पालिकेचा आजचा अर्थसंकल्प हा मुंबईच्या प्रगतीसाठी, भविष्यासाठी सादर केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी यंदा भरघोस वाढ सुचवली आहे. ही वाढ गेल्याबवर्षीच्या तूलनेत 17 टक्क्यांनी जास्त आहे. यात शिक्षण, आरोग्य, घनकचरा, आरोग्य, अग्निशमन दल आदी सर्वच खात्यासाठी उपयुक्त अर्थसंकल्प आहे.वास्तविक, कोविड संसर्ग असताना पालिकेने अर्थसंकल्पात अनपेक्षितपणे वाढ केली आहे. मुंबईकरांनी जो विश्वास दाखवला व त्यामुळे शिवसेनेला काम करण्यासाठी संधी दिली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी जी कामे सांगितली व सुचवली त्यांचा अंतर्भाव अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या खूप अपेक्षा – राखी जाधव

मुंबईत कोविडचा संसर्ग आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अद्यावत होणं ही मुंबईकरांची अपेक्षा आहे. कोरोना काळात दोन वर्षात चांगल्या आरोग्य सोयी सुविधा मुंबईकरांना मिळाल्या त्यामुळे मुंबईकरांचा विश्वास वाढला आहे. अपेक्षा वाढल्या आहेत. त्यासाठी भरीव तरतूद होणं अपेक्षित आहे.परंतु हे सर्व धिम्या गतीने सुरु आहे. तसेच, मुंबईत प्रकल्प होत असताना पुनर्वसनाच्या बाबतीतही विचार व्हायला हवा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी व्यक्त केली आहे.


हे ही वाचा – BMC Budget 2022 : यंदाचा अर्थसंकल्प 45,949.21 कोटींचा; गतवर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात 17 टक्के वाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -