घरताज्या घडामोडीजागतिक स्वच्छता दिनी सफाई कामगारांचा होणार गौरव, पालिकेचा धोरणात्मक निर्णय

जागतिक स्वच्छता दिनी सफाई कामगारांचा होणार गौरव, पालिकेचा धोरणात्मक निर्णय

Subscribe

जागतिक स्वच्छता दिनी पालिका सफाई कामगारांचा गौरव चिन्ह व विशेष आर्थिक मदत देऊन सन्मान करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक ओझा यांनी केली होती.

दिवसभर घाणीत काम करून मुंबई शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या पालिका सफाई कामगारांचा जागतिक स्वच्छता दिनी गौरव चिन्ह व विशेष आर्थिक मदत देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे घनकचरा खात्यातील सफाई कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भाजपचे नगरसेवक जगदीश ओझा (वार्ड क्र.२) यांनी, घाणीत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडत त्यांना सन्मानित करण्याची मागणी केली होती. मुंबई महापालिकेच्या घनकचरा खात्यात काम करणारे सफाई कामगार हे घाणीत उतरून प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून दररोज मुंबई शहर व उपनगरे परिसर स्वच्छ करण्याची कामे इमानेइतबारे पार पाडतात.

- Advertisement -

पालिकेत सफाई कामगार म्हणून संपूर्ण दिवसभर घाणीत काम केल्याने हे सफाई कामगार सतत आजारी पडतात. त्यांना टीबी, कॅन्सर यांसारखे गंभीर आजारही होतात. त्यामुळे फार कमी कामगार जास्त जीवन जगतात. अनेकजण कमी वयात आजारपणामुळे मृत्युमुखी पडतात. मृत्यूनंतर तट सफाई कामगारांच्या वारसाला पालिका सेवेत नोकरी मिळते. मात्र त्या मृत सफाई कामगाराला त्याच्या हयातीत कधीच आत्मसन्मानाने जगता येत नाही. त्याचा कोणीच गुणगौरव करीत नाही, अशी खंत व्यक्त करीत नगरसेवक जगदीश ओझा यांनी जागतिक स्वच्छता दिनी पालिका सफाई कामगारांचा गौरव चिन्ह व विशेष आर्थिक मदत देऊन सन्मान करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक ओझा यांनी केली होती.


हेही वाचा : पालिका रुग्णालयातील आरोग्य सुविधांची माहिती ॲपवर द्या, समाजवादी पक्षाची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -