घरताज्या घडामोडीअवघ्या १० वर्षाच्या मुंबईच्या 'chatpat' ने बनवलेली कॅडबरीची 'कुछ खास है' ही...

अवघ्या १० वर्षाच्या मुंबईच्या ‘chatpat’ ने बनवलेली कॅडबरीची ‘कुछ खास है’ ही आयकॉनीक जाहिरात होतेय व्हायरल

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून एका हटके व्हिडिओमुळे १० वर्षाचा मुंबईचा मुलगा सोशल मिडियावर हिट झाला आहे.आपल्या टपोरी भाषेचा वापर करुन सोशलमिडियावर नेटकऱ्यांकडून वाह-वाह करुन घेत आहे, तो म्हणजे मुंबईचा मुलगा १० वर्षाचा चटपट.खरंतरं चटपटने एका एनजीओसाठी प्रमोशनल व्हिडिओ शूट केला आहे.चटपटच्या या व्हिडिओला पाहून सोशल मिडियाचा वापर करणारे अनेकजण त्याचे फॅन झाले आहेत.चटपटने SOS चिल्ड्रन्स व्हिलेज इंडिया जे एक एनजीओ आहे यासाठी एक प्रमोशनल व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये, चटपटने कॅडबरीची ‘कुछ खास है’ ही आयकॉनीक जाहिरात कॉपी करत हुबेहुब तसाच व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओमध्ये चटपत यांनी कॅडबरीला आणि नागरिकांना या एनजीओसाठी देणगी देण्याचे आवाहन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chatpat (@chatpatkagyaan)

- Advertisement -

कॅडबरीच्या मूळ व्हिडिओप्रमाणेच चटपटने आपल्या व्हिडिओमध्ये मुलीची भूमिका पूर्णपणे कॉपी केली आहे. दोन्ही व्हिडिओची थीम क्रिकेट आहे, फक्त चटपटच्या व्हिडिओमध्ये स्टेडियम नाही तर, पार्श्वभूमीत झोपडपट्ट्या आहेत आणि चटपटमध्ये प्रेक्षक नसून, झोपडपट्टीतील काही मुले आहेत.

इंस्टाग्रामवर ‘चटपत का ग्यान’ नावाचे एक पेज आहे, ज्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “चॉकलेट खाण्यासाठी तुमच्या मित्रांच्या टोळीची वाट पाहू नका, पण फक्त गोड खाल्ल्याने तुमचे पोट भरणार नाही? @cadburydairymilkin, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर  @soschildrensvillagesindia मधील लोकांसाठी कुछ मीठा हो जाए? तुम्हाला काही गोड काम करायचे असेल, तर देणगी द्या, जेणेकरून प्रत्येक मूलगा #NoChildAlone राहील!”चटपत याने व्हिडिओसोबत असे कॅप्शन लिहिले आहे.

- Advertisement -

‘ही’ आहे कॅडबरीची ‘कुछ खास है’ आयकॉनीक जाहिरात

कॅडबरीच्या जाहिरातील नवा ट्विस्ट…

 


हे ही वाचा – Amazon India च्या प्रमुखांना आणि फ्युचर ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीचे समन्स


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -