घरताज्या घडामोडीशंभर कोटीच्या लेटरबॉम्बचा तपास संपवून सीबीआयचे पथक दिल्लीला रवाना

शंभर कोटीच्या लेटरबॉम्बचा तपास संपवून सीबीआयचे पथक दिल्लीला रवाना

Subscribe

लेटरबॉम्ब प्रकरणी ऍड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी केली होती.

शंभर कोटीच्या लेटरबॉम्बची चौकशी करणारी केंद्रीय यंत्रणा सीबीआयने या प्रकरणाचा मंगळवारी तपास पूर्ण करून त्याचा अहवाल सीबीआयच्या विधी विभागाकडे सोपवला आहे. सीबीआयचे संचालक विधी विभागाशी चर्चा करून पुढील निर्णय काय असतील हे ठरवतील अशी माहिती सीबीआयच्या सूत्रानी दिली आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर पसरमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री यांच्यावर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करून दिल्याचे टार्गेट दिले होते, असा लेखी अर्ज मुख्यमंत्री यांना दिले होते.

दरम्यान या लेटरबॉम्ब प्रकरणी ऍड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी केली होती. उच्च न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.  तसेच १५ दिवसात चौकशी संपवून न्यायालयात अहवाल सादर करावे असा आदेश दिला होता. या प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली येथून सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले होते. याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख ,तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग,अटकेत असलेला सचिन वाझे, माजी गृहमंत्री यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि ऍड.जयश्री पाटील असे एकूण ७ जणांकडे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहे.

- Advertisement -

सोमवारी या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून सीबीआयच्या चौकशी पथकाने सर्व कागदपत्रे आणि अहवाल सीबीआयच्या विधी विभागाकडे मंगळवारी सोपवून दिल्ली येथून आलेले पथक मंगळवारी दिल्लीला रवाना झाले आहे. सीबीआयचे संचालक विधी विभागाशी चर्चा करून लवकरच पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – हिरेन प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याला होणार अटक?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -